शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत , सरकारी इतमामात झाले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 04:25 IST

अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बंगळुरू : अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात मंगळवारी मरण पावलेल्या कर्नाटकातील पुरोगामी पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्यावर बुधवारी धार्मिक विधी न करता, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपा व हिंदुत्ववादाच्या विरोधात सातत्याने लिखाण करणा-या गौरी लंकेश यांच्या मारेक-यांच्या तपासासाठी कर्नाटक पोलिसांची तीन पथके स्थापन करण्यात आली आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) ही चौकशी करेल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले.मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक काँग्रेस, तसेच विरोधी नेत्यांनी त्या आधी गौरी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या अंत्ययात्रेत कन्नड चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. अंत्ययात्रेत ‘गौरी लंकेश अमर रहे’ या घोषणा दिल्या जात होत्या. अंत्ययात्रेत बंगळुरूसह राज्यभरातील अनेक लोक सहभागी झाले होते. (वृत्तसंस्था)तीन जणांनी सात गोळ्या झाडल्याया आधी कर्नाटकातील धारवाडमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली होती. त्यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्याने, आपल्या बहिणीच्या हत्येची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी इंद्रजीत लंकेश यांनी केली आहे.गौरी यांनी कर्नाटक भाजपाचे नेते प्रल्हाद जोशी यांच्याविरुद्ध लिखाण केले होते. त्यानंतर, जोशी यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. त्यात गौरी लंकेश यांना सहा महिन्यांची सजा झाली होती. त्या सध्या जामिनावर होत्या.गौरी लंकेश (वय ५५) काल कार्यालयातून बंगळुरूमधील राजराजेश्वरी नगरातील त्या घरी परतताच, तिथे लपून बसलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या.त्यापैकी दोन छातीत तर एक गोळी डोक्यात शिरली आणि त्या मरण पावल्या. त्यांच्या घराच्या व्हरांड्यात असलेल्या सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे मारेकºयांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे, तसेच डॉ. कलबुर्गी यांच्या व गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पद्धतीत साम्य दिसत असले, तरी आताच त्याबाबत निष्कर्ष काढता येणार नाही. गौरी यांच्या हत्येनंतर अप्रत्यक्षपणे काही जणांनी हत्येचे अप्रत्यक्ष समर्थन करणारे लिखाण आज सोशल मीडियावर चालविले होते. त्यांचीही चौकशी करण्यात येईल. - सिद्धरामय्या, मुख्यमंत्रीनिषेध : गौरी लंकेश यांच्या हत्येचा सर्व राजकीय पक्षांनी, तसेच पत्रकारांच्या संघटनांनी, तसेच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनीही गौरी यांच्या हत्येचा निषेध केला आहे. हत्येच्या निषेधार्थ नवी दिल्लीसह सर्व राज्यांमध्ये आज जोरदार निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशMurderखूनCrimeगुन्हा