शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 09:33 IST

Kerala Full Lockdown : केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. पुन्हा होणार संपूर्ण लॉकडाऊन.

ठळक मुद्दे केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. पुन्हा होणार संपूर्ण लॉकडाऊन.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. परंतु देशाच्या अनेक भागांमध्ये आता दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. परंतु सध्या केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु केरळमध्ये २४ आणि २५ जुलै रोजीच लॉकडाऊन लागू राहणार आहे. दरम्यान २४ आणि २५ जुलै रोजी १२ आणि १३ जून रोजी जारी करण्यात आलेलेच निर्देश लागू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

केरळमध्ये गेल्या चोवीस तासांमध्ये गेल्या २५ दिवसांमधील सर्वाधिक १६,८४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. यापूर्वी ५ जून रोजी राज्यात १७,३२८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. दरम्यान, संपूर्ण देशात नव्या रुग्णांच्या झालेल्या नोंदीपैकी ४० टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण हे केरळमध्येच सापडले आहेत. पूर्वेकडे मिझोरममध्ये आतापर्यंत ८०६ आणि मणिपूरमध्ये ११२७ रुग्णांची नोंद झाली  आहे.  सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंयापूर्वी मंगळवारी बोलताना पिनराई विजयन यांनी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले नियम हे आठवड्याभरासाठी कायम राहणार असल्याचं म्हटलं होतं. सध्या केरळमध्ये संसर्गाचा दर हा १० ट्क्यांपेक्षाही अधिक आहे. दरम्यान, यापूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाचा दर अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून सर्वोच्च न्यायालयानंही फटकारलं होतं.

आसामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा दर अधिक असल्यानं लॉकडाऊन काय राहणार आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशात लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यू एकाआठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे हरयाणामध्ये निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली असली तरी काही नियम लागू करण्यात आले आहेत.

टॅग्स :KeralaकेरळMaharashtraमहाराष्ट्रAssamआसामmizoram-pcमिजोरमcorona virusकोरोना वायरस बातम्या