शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी पंतप्रधानांविरुद्धच्या तक्रारीवर पूर्णपीठ करील सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 06:16 IST

पूर्ण पीठाने तक्रार फेटाळल्यास चौकशीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही किंवा कोणालाही दिली जाणार नाहीत, असे लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासंबंधी अधिसूचित नवीन नियमात म्हटले आहे.

नवी दिल्ली : विद्यमान किंवा माजी पंतप्रधानांविरुद्ध दाखल तक्रारीवर लोकपालांचे पूर्ण पीठ बंद कक्षात सुनावणी घेईल. पूर्ण पीठाने तक्रार फेटाळल्यास चौकशीशी संबंधित कोणतीही माहिती प्रसिद्ध केली जाणार नाही किंवा कोणालाही दिली जाणार नाहीत, असे लोकपालांकडे तक्रार दाखल करण्यासंबंधी अधिसूचित नवीन नियमात म्हटले आहे. लोकपाल संस्था स्थापन करण्यात आल्यानंतर सरकारने तब्बल वर्षभरानंतर तक्रार दाखल करण्यासंबंधीने नियम अधिसूचित केले आहेत. २ मार्च २०२० रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने अधिसूचित केलेल्या लोकपाल (तक्रार) नियमांत विद्यमान किंवा माजी पंतप्रधानांविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांबाबत कशी कार्यवाही करायची, याचे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. या नियमांनुसार तक्रारदाराने विद्यमान किंवा माजी पंतप्रधानांविरुद्ध तक्रार दाखल केल्यास त्यावर लोकपालांचे पूर्णपीठ (अध्यक्ष आणि सर्व सदस्य) तक्रारीबाबत चौकशी सुरूकरता येऊ शकते की नाही, यावर विचार करील. लोकपालांचे किमान दोनतृतीयांश सदस्यांचे पीठ तक्रारीबाबत चौकशी करायची की नाही, याचा निर्णय घेईल.>अशा तक्रारी फेटाळल्या जातील : नियमात हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, लोकपाल कोणत्या आधारे तक्रार फेटाळू शकते. खोटी, वा आकसबुद्धीने केलेली किंवा क्षुल्लक असल्यास तसेच तक्रारीत लोकसेवकांविरुद्ध आरोप स्पष्ट नसल्यास लोकपाल तक्रार फेटाळू शकते. अन्य न्यायायल, न्यायाधिकारी किंवा प्राधिकरणाकडे तक्रार प्रलंबित आहे किंवा कथित गुन्हा सात वर्षांच्या अवधीत नसल्यास अशा तक्रारी लोकपाल फेटाळू शकते.