शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आता डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर; आठ दिवसांत पाच रुपयांनी वाढले दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 07:03 IST

अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोल शंभरीपार; सामान्यांवर मोठा भार

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आठ दिवसामध्ये सातवेळा वाढ झाल्याने दिल्लीसह बहुतांश राज्यांच्या राजधानीत पेट्रोलच्या किमतीने १०० रुपये प्रति लिटरचा टप्पा ओलांडला आहे, तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ४.८० रुपये प्रति लिटर वाढ झाली आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात ८० पैसे तर डिझेलमध्ये ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९१.४७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती राज्यानुसार बदलतात.सरकारने कमावले ३.३१ लाख कोटीकेंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर (२०२१) या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून ३.३१ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. सरकारने उत्पादन शुल्कात आतापर्यंत १३ वेळा वाढ केली असून, केवळ चारवेळा हे शुल्क कमी केले आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर चढे राहिले आहेत.निवडणुका होताच दरवाढीचा सपाटासातवेळा किमतीत वाढ : पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे विक्रमी १३७ दिवस दर स्थिर राहिल्यानंतर, २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सातवेळा किमतीत वाढ करण्यात आली आहे.वाढता वाढता वाढे...मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे पेट्रोलचे दर १०० रुपयाच्या पुढे गेले आहेत. बहुतांश राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शतकाचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत पेट्रोल पुन्हा एकदा ११५.०४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले असून, डिझेलच्या किमतीला शतक पूर्ण करण्यासाठी अवघे ७५ पैशांची वाढ होणे बाकी आहे.सात दिवसांत अशी झाली वाढ (पैशांमध्ये)                पेट्रोल    डिझेल२२ मार्च     ८०    ८० २३ मार्च     ८०    ८० २५ मार्च     ८०    ८० २६ मार्च     ८०    ८० २७ मार्च     ५०     ५५ २८ मार्च     ३०     ३५ २९ मार्च     ८०     ७०प्रमुख शहरातील दर(प्रति लिटर रू.)                पेट्रोल    डिझेलपरभणी    ११८.९      १००.७२नागपूर      ११४.९६   ९७.७३पुणे     ११४.७१      ९७.४६नांदेड     ११७.४९    १००.१५नाशिक     ११५.३९      ९८.१२औरंगाबाद ११५.६९     ९८.४०

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढ