शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

इंधनाच्या भडक्याचा सरकारला धसका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:37 IST

दर घटविण्यासाठी आठवडाभरात उपाय करणार

नवी दिल्ली/मुंबई : पेट्रोल व डिझेलचे दर कडाडल्याने उडालेल्या महागाईच्या भडक्याचा आणि जनतेच्या संतापाचा धसका केंद्र सरकारने घेतला. या ‘इंधन आपत्ती’तून बाहेर पडण्यासाठी सरकार आठवडाभरात उपाय करणार आहे. मात्र त्यावरील अबकारी कम कमी करण्याचा वा ही दोन्ही इंधने जीएसटीखाली आणण्याचा सरकारचा विचार नाही. डिझेलचे दर कमी न केल्यास २० जूनपासून बेमुदत संप करू, असा इशारा आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने (एआयएमटीसी) दिला आहे.गेल्या ९ दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव लिटरमागे २.२४ रुपये तर डिझेलचे भाव २.१५ रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या दरांमुळे रोष वाढत आहे. ते पाहून पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आम्ही लवकरच मार्ग काढू असे सांगितले.डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदार जाणार बेमुदत संपावर; ९ दिवसांत पेट्रोल २.२४ रुपये तर डिझेल २.१५ रुपयांनी महागलेमोदी सरकारसमोर काय पर्याय?केंद्र सरकार पेट्रोलवर १९.४८ रुपये तर डिझेलवर १५.३३ रुपये उत्पादन कर लावते. हा कर कमी केला जाऊ शकतो. प्रत्येक राज्य वेगवेगळा व्हॅट आकारतात. महाराष्ट्रात ४६.५२ टक्के व्हॅट लावते. तो कमी केंद्राने सूचित केले होते. मात्र त्याला राज्यांनी प्रतिसाद दिला नाही. तिकीट दरांची संभाव्य वाढ रोखण्यासाठी हवाई इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणा, अशी मागणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जीएसटी परिषदेकडे केली आहे.केंद्र सरकारने एक रुपयाने अबकारी कर कमी केल्यास महसुलाला १३ हजार कोटींचा फटका बसतो.मालवाहतूक महागणारमहाराष्ट्र मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने राज्यात डिझेल ६४ रुपये प्रति लिटर असताना भाड्याचा दर निश्चित केला. आता मात्र डिझेल ७२ रुपयांवर गेले आहे. दरवाढीमुळे दीर्घ पल्ल्याच्या फेऱ्यांच्या खर्चात ४००० रुपये प्रति फेरी वाढ झाली आहे. त्यामुळेच लांब पल्ल्याच्या ट्रकभाड्यात किमान २००० रुपये प्रति फेरी वाढ येत्या काळात होऊ शकते, असे असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नाटकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Petrolपेट्रोलCrude Oilखनिज तेल