शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देशात विमानाचे इंधन डिझेलपेक्षाही स्वस्त; दर ७२.२२ रुपये प्रति लीटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 01:53 IST

केंद्र सरकारने विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांची (२.२२ रुपये प्रति लीटर) घट केली. यामुळे मुंबईत हे इंधन १.९५ रुपये स्वस्त झाले आहे. डिझेलपेक्षाही कमी दरात ते उपलब्ध झाले आहे.

मुंबई : केंद्र सरकारने विमान इंधनावरील उत्पादन शुल्कात ३ टक्क्यांची (२.२२ रुपये प्रति लीटर) घट केली. यामुळे मुंबईत हे इंधन १.९५ रुपये स्वस्त झाले आहे. डिझेलपेक्षाही कमी दरात ते उपलब्ध झाले आहे. पेट्रोलसाठी ८८ आणि डिझेलसाठी ७९ रुपये प्रति लीटर मोजावे लागत असताना विमानाचे इंधन मात्र ७२.२२ रुपये प्रति लीटर झाले आहे.विमानाच्या इंधनावर केंद्र सरकार आतापर्यंत १४ टक्के उत्पादक शुल्क आकारत होते. ते आता ११ टक्के केले आहे. यामुळे इंधन स्वस्त झाले आहे. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने विमानाचे इंधन चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१८ यादरम्यान विमानाचे इंधन ५८.६० टक्क्यांनी महाग झाले. जुलै ते सप्टेंबर २०१८ दरम्यान त्यात ९.५० टक्के वाढ झाली. निर्यातीपेक्षा आयात वाढल्याने देशाची चालू खात्यातील तूट वाढत होती.ही तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मागील महिन्यातच विमान इंधनाच्या आयातीवर ५ टक्के शुल्क लावले होते. त्यातून वाढलेले दर कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने विमानाच्या इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे.प्रवाशांचा होणार फायदा?हे इंधन स्वस्त झाल्याचा गुरुवारी हवाई क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना फायदा झाला. दिवसभर बाजारात मोठी घसरण झाली. बहुतांश कंपन्यांचे समभाग कोसळले असले तरी विमान कंपन्यांच्या समभागांमध्ये जवळपास २ टक्के वाढ झाली.इंधन स्वस्त झाल्याने तिकीट दर कमी होतील, त्यातून प्रवासी वाढतील व कंपन्यांना फायदा होईल, या आशेने गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

टॅग्स :Petrolपेट्रोल