शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सीव्हीत खोटी माहिती देताय? मग लाय डिटेक्टर टेस्टसाठी तयार राहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 13:03 IST

अनेक कंपन्या मुलाखतीनंतर लाय डिटेक्टर टेस्ट करु लागल्या आहेत

हैदराबाद: जर तुम्ही तुमच्या सीव्हीमध्ये (CV) खोटी माहिती देत असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही करत असलेली ही लबाडी पकडली जाऊ शकते. मुलाखतीसाठी येणारे उमेदवार खोटे बोलत असल्यानं, त्यांच्या सीव्हीमध्ये चुकीची माहिती देत असल्यानं अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी आता लाय डिटेक्टर टेस्टचा वापर करण्यास सुरू केलीय. याशिवाय कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठीही कंपन्यांकडून या टेस्टचा आधार घेतला जातोय. कर्मचाऱ्यांकडून केले जाणारे अपहार आणि बाहेर फोडली जाणारी संवेदनशील माहिती यांचा शोध घेण्यासाठीही कंपन्या  लाय डिटेक्टर टेस्ट करु लागल्या आहेत. हैदराबाद शहरातील ट्रूथ लॅबमध्ये दरवर्षी 20 ते 30 कर्मचाऱ्यांच्या लाय डिटेक्टर टेस्ट होतात. कर्मचाऱ्यांच्या परवानगीनंतरच या टेस्ट केल्या जातात. 'शहरातील अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेदरम्यान लाय डिटेक्टर टेस्ट करतात. सध्या हे प्रमाण वाढू लागलंय. अनेक युरोपियन कंपन्यांमध्ये लाय डिटेक्टर टेस्ट अनिवार्य आहे. त्याशिवाय भरती प्रक्रिया पूर्णच होत नाही,' अशी माहिती ट्रूथ लॅब्सचे संचालक जीव्हीएचव्ही प्रसाद यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. लाय डिटेक्टर टेस्ट करण्यासाठी देशभरातून तज्ज्ञ व्यक्ती येत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. 'या टेस्टमध्ये हृदयाचे ठोके, नाडी आणि रक्तदाब तपासला जातो. यासोबतच तीन प्रश्नदेखील विचारले जातात. यामध्ये नियंत्रित, विषयाशी संबंध असलेल्या आणि नसलेल्या प्रश्नांचा समावेश असतो. टेस्टसाठी आलेल्या व्यक्तीला या प्रश्नांची उत्तरं हो किंवा नाही, या दोन पर्यायांमध्ये द्यायची असतात. यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरांची तपासणी केली जाते,' अशी माहिती प्रसाद यांनी दिली. या लॅबमध्ये केवळ कंपन्यांशी संबंधित लाय डिटेक्टर टेस्ट केल्या जातात. विवाहबाह्य संबंध यासारख्या घरगुती समस्यांसाठी याठिकाणी टेस्ट केली जात नाही. इथे होणाऱ्या प्रत्येक टेस्टसाठी 5 ते 10 हजार रुपये आकारले जातात.  

टॅग्स :jobनोकरीinterviewमुलाखत