शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांची निराशा; ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण पाहता न आल्याने लोकांचा हिरेमोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 06:33 IST

पंतप्रधानांची निराशा; दक्षिण भारतात विलोभनीय दर्शन

मुंबई/नवीदिल्ली : देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे गुरुवारचे कंकणाकृती सूर्यग्रहण बघता न आल्याने नागरिकांचा पुरता हिरेमोड झाला. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेमका असाच अनुभव आला. पंतप्रधानांना केरळमधील कोडिकोळ येथे दिसणाऱ्या सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण पाहून त्यावर समाधान मानावे लागले. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सूर्यग्रहणाचे व्यवस्थितदर्शन झाले.

गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेले हे सूर्यग्रहण जगातील अधिकाधिक भागांमध्ये पाहिले गेले. आशियातले सर्व देश तसेच आॅस्ट्रेलियामधूनही या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे व्यवस्थित दर्शन झाले. २०१९ या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण होते. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळाले. अग्निच्या सुवर्णकड्याच्या रुपात दिसलेले हे ग्रहण ‘रिंग आॅफ फायर' नावानेही ओळखले जाते. जगातील इतर भागांपेक्षा भारतामध्ये हे ग्रहण अधिक स्पष्टपणे पाहाता आले. त्यातही दक्षिण भारतामध्ये या कंकणाकृती सूर्यग्रहणाचे आणखी विलोभनीय दर्शन झाले. भारतामध्ये गुरुवारी सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी सुरू झालेल्या या ग्रहणाची कंकणाकृती अवस्था सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी दिसली.  भारतामध्ये गुरुवारी कोईमतूरमध्ये सर्वप्रथम कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. केरळमधील कन्नूर, पल्लकड, कासारगोड आदी तर कर्नाटकातील मंगळुरू, म्हैसूर या भागात तर तामिळनाडूतील काही भागांतून तर सौदी अरेबिया, कतार, मलेशिया, ओमान, सिंगापूर, श्रीलंका आदी देशांतून गुरुवारचे कंकणाकृती सूर्यग्रहण सुस्पष्टपणे दिसले. 

वंचित राहिल्याची खंत

ढगाळ वातावरणामुळे दिल्लीतून गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहणाचे दर्शन न घेता आल्याची रुखरूख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टिष्ट्वटद्वारे व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, सूर्यग्रहण प्रत्यक्ष पाहाण्याच्या अनुभवापासून देशातील लक्षावधी लोकांप्रमाणेच मलाही वंचित राहावे लागले. कोडिकोळ येथे दिसलेले सूर्यग्रहण थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी पाहिले असले तरी प्रत्यक्ष दर्शनाला आपण मुकलो, ही खंत त्यांना वाटत होती. या सूर्यग्रहणाबद्दल खगोलतज्ज्ञांकडून माहिती जाणून घेतल्याचे ते म्हणाले. 

ग्रहण पाहातानाची मोदींची छायाचित्रे चर्चेचा विषयगॉगल लावून व ग्रहणाचा चष्मा हातात धरून सूर्याकडे पाहात असल्याचे व तज्ज्ञांशी चर्चा करतानाची आपली छायाचित्रे मोदींनी टिष्ट्वटरवर झळकविली. गॉगल लावून सूर्याकडे पाहाणाऱ्या मोदींच्या छायाचित्रावर खूप मीम बनतील, असे एका टिष्ट्वटर वापरकर्त्याने लिहिताच मोदींनी त्यावर मोस्ट वेलकम, एन्जॉय अशी खेळकर प्रतिक्रिया दिली. या छायाचित्रावर नेटकऱ्यांनी मोदींना ट्रोल केले तसेच काही वेळाने या छायाचित्राची अनेक मीम सोशल मीडियावर झळकू लागली. पंतप्रधानांनी घातलेला गॉगल कोणत्या ब्रँडचा असून त्याची किंमत किती आहे, याचीही नेटकºयांनी चर्चा केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSun strokeउष्माघातdelhiदिल्लीMumbaiमुंबई