शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 08:02 IST

RSS Chief Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी समान अधिकाराचा मुद्दा मांडला. 

RSS chief Mohan Bhagwat latest speech: 'आज गरज आहे ती समाजातील जातीभेद बाजूला सारून उभे राहण्याची आणि एक समरस आणि सर्वसमावेश राष्ट्र घडवण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम नागरिक घडवण्याचे आहे. आणि नागरिक घडवण्याच्या माध्यमातूनच कुटुंब, समाज, देश आणि अंतिमतः संपू्र्ण मानवतेबद्दलच्या उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते', असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काढले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांच्या भागात असलेल्या शाखांबद्दल आणि कामाबद्दलची माहिती घेतली. 

वाचा >>"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक

मोहन भागवत म्हणाले, "शाखा असलेल्या भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत संघ गेला पाहिजे. आपण म्हणतो की, वसुधैव कुटुंबकम... विश्वच एक कुटुंब आहे. हीच भावना घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्याचा विस्तार समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात केला आहे."

पंच परिवर्तन सूत्र घेऊन संघ करतोय काम

"देशभरात लाखो सेवा कार्य स्वयंसेवक आणि समाजाच्या सहकार्याने सुरू आहेत. या कार्यातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन केले जात आहे. सध्या संघाने शताब्दी वर्षात पाऊल ठेवले आहे आणि पंच परिवर्तन हे सूत्र घेऊन काम करत  आहे. समाजाला जागरूक, उत्तरदायी आणि संवेदनशील बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे", असेही मोहन भागवत म्हणाले. 

मंदिर असो वा स्मशानभूमी, त्यावर सगळ्याचा समान अधिकार हवा

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "समाज असा असावा की, त्याला देशाबद्दलच्या जबाबदारी जाणीव असायला हवी. पर्यावरण पूरक जीवनशैली स्वीकारा आणि जातीभेदातून मुक्त व्हा. मंदिर, पाण्याची ठिकाणे, स्मशानभूमी या सारख्या सार्वजनिक संसाधनांवर पूर्ण समाजाला समान अधिकार हवा. तीच खरी सामाजिक समरसता आहे", अशी भूमिका भागवत यांनी मांडली. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघdelhiदिल्ली