शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

Fastag नं सरकार झालं मालामाल; मागील ५ वर्षात दुप्पट कमाई, जाणून घ्या आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 20:08 IST

फास्टटॅग हे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टिम आहे. रेडिया फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीवर फास्टटॅग काम करते.

नवी दिल्ली - २०२३ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात १९ जूनपर्यंत सरकारला फास्टटॅगच्या माध्यमातून २८,१८० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. २०२१ ते २०२२ या काळात फास्टटॅगमधून येणाऱ्या कमाईत ४६ टक्के वाढ झाली. ३४७७८ कोटींहून ५०,८५५ कोटी रुपये सरकारला नफा झाला. मागील ५ वर्षात म्हणजे २०१७ ते २०२२ या काळात FastTag मधून मिळणारा महसूल दुप्पट झाला आहे. 

२०२१ मध्ये फास्टटॅग हे सर्व वाहनांसाठी बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे कलेक्शनमध्ये ही वाढ झाल्याचे दिसून येते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानुसार, मे २०२३ पर्यंत देशात एकूण ७.०३ कोटी वाहनांना फास्टटॅग आहे. २०१९ नंतर फास्टटॅगमध्ये वेगाने वाढ झाली. २०१९ मध्ये देशात केवळ १.७० कोटी वाहनांना फास्टटॅग लावण्यात आले होते. 

सर्वात जास्त टोल प्लाझा कोणत्या राज्यात?देशात ९६४ हून अधिक टोल प्लाझा आहेत जिथं फास्टटॅग सिस्टीम लावली आहे. त्यात सर्वात जास्त टोल प्लाझा मध्य प्रदेशात आहे. इथं एकूण १४३ टोला प्लाझावर फास्टटॅगने वसुली केली जाते. तर दुसऱ्या नंबरवर उत्तर प्रदेश आहे. ज्याठिकाणी ११४ टोल प्लाझावर फास्टटॅगने वसुली होते. महाराष्ट्रात ८४ टोल प्लाझा आहेत. तेलंगणा ५१, कर्नाटक ७७, तामिळनाडू ६९, आंधप्रदेश ६०, राजस्थान १०४ टोलप्लाझा आहेत. 

फास्टटॅग हे इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टिम आहे. रेडिया फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन टेक्नोलॉजीवर फास्टटॅग काम करते. प्रत्येक फास्टटॅगला वाहनाचे रजिस्ट्रेशन डिटेल्स जोडलेले असतात. फास्टटॅग लावल्याआधी टोल प्लाझावर थांबून टोलचे रोकड पैसे भरावे लागत होते. मात्र फास्टटॅग आल्याने टोल प्लाझावर वाहनांची गर्दी कमी होऊन वाहनचालकांच्या वेळेची बचतही झाली. 

Fastag कुठे खरेदी करू शकता? देशात कुठल्याही टोल प्लाझावर तुम्ही फास्टटॅग खरेदी करू शकता. त्याशिवाय एक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय, कोटक बँकेच्या शाखेतही तुम्ही खरेदी करू शकता. पेटीएम, Amazon Pay, Google Pay, PhonePe यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही तुम्हाला फास्टटॅग मिळेल. फास्टटॅग हे तुमच्या अकाऊंटशी लिंक असते. एकदा फास्टटॅग खरेदी केल्यानंतर ५ वर्षापर्यंत हे स्टिकर व्हॅलिड असते. ५ वर्षानंतर स्टिकर बदलावे लागते. 

टॅग्स :Fastagफास्टॅग