शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; तुमच्याकडे AC, फ्रिज आणि कार असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 13:30 IST

तुमच्या घरामध्ये AC, फ्रिज आणि कार असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.

नवी दिल्ली, दि. 7 -  तुमच्या घरामध्ये AC, फ्रिज आणि कार असेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.  टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार शहरी भागातील कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची पाहणी करणार आहे. ज्यामुळे तुम्हाला सरकारी योजनांची गरज आहे का? हे याद्वारे तपासले जाणार आहे. शहरी भागातील प्रत्येकी दहा कुटुंबाची आर्थिक चाचपणी करण्यात येणार आहे. त्यापैकी चार कुटुंबाना कल्याणकारी योजनेंचा लाभ देण्यात येणार आहे तर सहा कुटुंबाना या योजनेतून बाद ठरवण्यात येणार आहे. 

बिबेक देबरॉय यांच्या कमिटीच्या प्रस्तावानुसार केंद्र सरकारने शहरी भागातील कुटुंबासाठी नवी रुपरेषा आखली आहे. यानुसार, शहरी भागातील ज्या कुटुंबाकडे चार रुमचे फ्लॅट, चार चाकी गाडी अथावा घरामध्ये एयर कंडिशनर असल्यास स्वत: कल्याणकारी योजनेतून बाहेर पडावे. त्यांनी कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून आपले नाव काढावे. 

ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, अशा कुटुंबाची रुपरेषाही बिबेक देबरॉय यांच्या कमिटीने तयार केली आहे. त्यानुसार,जे परिवार बेघर आहेत, जे प्लास्टिकच्या छप्परखाली राहत आहेत, ज्या परिवारांच्या कमाईचे काही स्थिर साधन नाही, ज्या परिवारात कमविण्याच्या वयाचे कोणी पुरुष सदस्य नाही आहेत, ज्या परिवाराचा मुख्य कोणी लहान मुल आहे, अशांना कल्याणकारी योजनेत आपोआप जोडून घेतले जाणार आहे. खरोखर एखाद्या परिवाराला लाभार्थ्यांच्या सुचीत टाकण्याची गरज आहे का ? अशा पद्धतीने काम केले जाणार आहे. या सर्वेक्षणाला १ ते १२ अशा भागात विभागले जाणार आहे. राहण्याची स्थिती, सामाजिक स्थिती आणि हुद्दा या मुद्द्यांची पाहणी केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, डिसेंबर 2012 मध्ये हाशिम कमेटीनेही शहरी भागातील कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर रिपोर्ट सरकारकडे दिला होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या UPA सरकारनं ह्या रिपोर्टला मंजूरी दिली नव्हती.  हाशिम समितीने केलेल्या शिफारसी नुसार सरकारी योजनांच्या लाभासाठी ४१ टक्के परिवारांचे सर्वेक्षण करावे लागणार होते. पण देवरॉय समितिच्या शिफारसीनुसार साधारण ५९ टक्के परिवार सर्वेक्षणामध्ये येणार आहेत असेही सुत्रांतर्फे सांगण्यात आले आहे.