शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Prophet Row : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा ट्रेनवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 22:53 IST

Prophet Row : नुपूर शर्मांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही.

Prophet Row : भाजपतून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या ल्नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशात सुरू झालेला हिंसक निदर्शनांचा प्रकार अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाही. पश्चिम बंगालमधील हावडा येथे झालेल्या हिंसाचारानंतर रविवारी नादिया जिल्ह्यात निदर्शनाला हिंसक वळण लागले. नादिया जिल्ह्यातील बेतुआधारी रेल्वे स्थानकावर सुमारे एक हजार लोकांच्या जमावाने रेल्वेवर हल्ला केला. लोकांनी ट्रेनवर दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर स्थानकावरील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. तसंच काही रिपोर्ट्सनुसार काही समाजकंटकांनी आसपासच्या दुकानांचंही नुकसान केलं.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या संख्येने आंदोलक रस्ता अडवत होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता काही जण रेल्वे स्थानकात घुसले आणि त्यांनी रेल्वेवर दगडफेक सुरू केली. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे लालगोला मार्गावरील सेवा ठप्प झाली. पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातही हिंसाचार झाला आहे. हावडा येथेही एक दिवसापूर्वी हिंसाचार झाला होता. यानंतर मेदिनीपुरीत राजकीय नाट्य सुरू झाले. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांना प्रशासनाकडून पत्र देऊन हावडा येथे न जाण्यास सांगण्यात आले. त्याच वेळी अधिकारीही तेथील भाजप कार्यालयावर हल्ला झाला असल्याने हावडा येथे जाणे हा आपला हक्क असल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम होते. जर आपल्याला थांबवण्यात आलं तर आपण न्यायालयात जाऊ असा इशाराही त्यांनी दिला होता. हावडामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

टॅग्स :BJPभाजपा