शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal: आम्ही नव्हे, तर डॅसो एव्हिएशेननं केली रिलायन्सची निवड; फ्रान्स सरकारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 09:25 IST

फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांच्या विधानानंतर फ्रान्समध्ये खळबळ

नवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन निर्माण झालेलं वादळ अद्याप शांत झालेलं नाही. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानामुळे भारतासह फ्रान्समध्येही खळबळ माजल्यानंतर आता याबद्दल फ्रान्स सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. राफेल विमान करारासाठी भारतीय कंपनीची निवड करण्यात फ्रान्स सरकारचा सहभाग नव्हता. या करारासाठी भारतीय कंपनीची निवड करण्याचा पूर्ण अधिकार फ्रान्समधील कंपनीला असल्याचं फ्रान्स सरकारनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. राफेल डीलसाठी मोदी सरकारनं फक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचं नाव सुचवलं होतं. त्यामुळेच फ्रान्सच्या डॅसो एव्हिएशेन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असं विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केल्यानं एकच खळबळ उडाली. मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल करार केला, अशी टीका यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. मोदींनी वैयक्तिक रस घेऊन राफेल डीलमध्ये बदल केले, असा आरोप राहुल गांधींनी ओलांद यांच्या विधानानंतर केला. राहुल गांधींनी ओलांद यांचे आभार मानत मोदींवर निशाणा साधला. 'दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानींसाठी मोदींनी कोट्यवधी रुपयांचा करार केला. त्यांनी देशाचा विश्वासघात केला. त्यांनी आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांचा अपमान केला,' अशा शब्दांमध्ये राहुल मोदींवर बरसले. फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानाचे पडसाद फ्रान्समध्येही पाहायला मिळाले. राफेल डीलमध्ये भारतीय कंपनीची निवड फ्रान्स सरकारकडून नव्हे, तर डॅसो एव्हिएशेनकडून करण्यात आली. डॅसो एव्हिएशेनला आपली भागीदार कंपनी निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं स्पष्टीकरण फ्रान्स सरकारनं ओलांद यांच्या विधानानंतर दिलं. डॅसो एव्हिएशेनला भारतामधील भागीदार कंपनीची निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं आणि फ्रान्सच्या कंपनीनं रिलायन्सच्या रुपात सर्वोत्तम पर्यायाची निवड केली, असंदेखील फ्रान्स सरकारनं स्पष्टीकरणात म्हटलं.  

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदीAnil Ambaniअनिल अंबानीRelianceरिलायन्सRahul Gandhiराहुल गांधीFranceफ्रान्स