शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अ‍ॅपवर लवकरच मोफत टीव्ही शो, चित्रपट, बातम्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 06:16 IST

प्रवाशांसाठी नवी सुविधा : सर्व स्थानके होणार वाय-फाययुक्त; जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळणार

नवी दिल्ली : रेल्वेची स्थानकांवर वाट पाहणारे किंवा रेल्वेतून जाणारे प्रवासी यांना लवकरच रेल्वेतर्फे विकसित करण्यात येणाऱ्या मोफत अ‍ॅपमुळे रेकॉर्ड केलेले मनोरंजन तसेच वृत्तविषयक कार्यक्रम मोफत पाहता येतील.

या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम रेल्वे बोर्डाने रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. आवडत्या हिंदी मालिका असोत वा रात्री वृत्तवाहिनींवरून प्रसारित होणाºया चर्चा त्या गोष्टी रेल्वे प्रवाशांना पाहता येतील. या अ‍ॅपच्या वापरामुळे रेल्वेला जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूलही मिळण्याची शक्यता आहे. देशभरातील १६०० रेल्वेस्थानकांवर याआधीच वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, उर्वरित ४७०० स्थानकांवर हे काम येत्या आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलवर विविध दूरचित्रवाहिन्यांच्या मालिका, चित्रपट, गाणी, आध्यात्मिक कार्यक्रम, बातम्या, विविध घडामोडींवर वृत्तवाहिन्यांवरून होणाºया चर्चा हे सारे काही रेल्वे प्रवाशांना पाहता येईल.

हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी झोनल रेल्वे विभागांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांना ती पेलता न आल्याने आता ते काम रेलटेल कॉर्पोरेशनकडे सोपविले आहे. तशी माहिती रेल्वे बोर्डाने ११ जुलै रोजी काढलेल्या एका आदेशात देण्यात आली आहे. रेलटेलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष पुनीत चावला यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी रेलटेललाच रेल्वे बोर्डाने प्राधान्य दिले आहे. आता या कामासाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू होईल. देशातील विविध विमानतळांनी आपल्या प्रवाशांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वत:चे एफएम चॅनल सुरू केले. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांची आवडनिवड लक्षात घेऊन रेलटेल कॉर्पोरेशन या अ‍ॅपद्वारे त्यांना मोफत कार्यक्रम दाखविणार आहे.

रेल्वे प्रवाशांना आपल्या मोबाईलवर विविध कार्यक्रम बघण्याची इच्छा असते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानदृष्ट्या रेल्वे यंत्रणा मागे राहू नये म्हणूनही त्याकरिता नवे अ‍ॅप रेलटेलकडून विकसित करण्यात येत आहे. मागणी तसा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबायला पाहिजे.त्यातून मोठा महसूल मिळून रेल्वेला फायदा होईल, असे जानेवारी २०१७ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले होते. विमानांमध्येही प्रवाशांना टीव्ही कार्यक्रम मोफत बघण्याची सोय विमान कंपन्यांनी काढून टाकली. प्रत्येक जण आपला मोबाईल या कामासाठी वापरतो.

टॅग्स :railwayरेल्वे