शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांना मोफत चहा अन् आरामाची सुविधा; अपघात टाळण्यासाठी 'या' सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 07:42 IST

बहुतांश रस्ते अपघात हे महामार्गावर होतात कारण ट्रक आणि अन्य वाहनचालकांना गाडी चालवताना डुलकी येते.

भुवनेश्वर - देशात दिवसेंदिवस रस्ते अपघातातील मृतांची संख्या वाढत चाललीय. दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. याच अपघातांना आळा घालण्यासाठी ओडिशा सरकारनं घेतलेल्या निर्णयाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. महामार्गावर चालणाऱ्या अवजड वाहनांचे अपघात रोखण्यासाठी ओडिशाचे परिवहन मंत्री तुकुनी साहू यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. 

ओडिशा सरकारनं रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या अवजड वाहनचालकांना मोफत चहा देण्याची सुविधा करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश रस्ते अपघात हे महामार्गावर होतात कारण ट्रक आणि अन्य वाहनचालकांना गाडी चालवताना डुलकी येते. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने महामार्गावर मोफत चहा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री साहू यांनी माध्यमांना सांगितले.

याबाबत मंत्री तुकुनी साहू यांनी म्हटलं की, सर्व जिल्ह्यातील रस्ते परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गावरील रस्त्याशेजारी असलेल्या हॉटेल, ढाबे यांची गणना करून तिथे वाहन चालकांना रात्रीच्या वेळी डुलकी लागू नये यासाठी मोफत चहा देण्याची सुविधा करा.इतकेच नाही तर त्यांच्या आरामाची सोयही राज्य सरकारकडून केली जाईल. पुढील वर्ष १ ते ७ जानेवारी काळात रस्ते सुरक्षा सप्ताहात मोफत चहा देण्याची तयारी सरकारने केली आहे. 

भारतात रस्ते अपघातजागतिक आरोग्य संघटनेद्वारे रस्ता सुरक्षेवर जारी आकडेवारीनुसार, जगभरात रस्ते अपघातात मृतांची संख्या दरवर्षी १.१९ मिलियन इतकी आहे. भारतात ही संख्या जास्त आहे. भारतात रस्ते अपघातात २०२२ च्या रिपोर्टनुसार, २०१८ मध्ये १ लाख ५० हजार ७८५, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ५३ हजार ७९२ इतकी मृतांची संख्या आहे. भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृतांची संख्या २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये १७ टक्क्यांनी वाढली होती. २०२१ मध्ये एकूण रस्ते अपघात ४ लाख ३ हजार इतके झाले होते. जे १ वर्षापूर्वी ३ लाख ५४ हजार इतके होते.  

टॅग्स :OdishaओदिशाAccidentअपघात