शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

5 वर्षांपर्यंत मोफत रेशन PM मोदींचा 'मास्टर स्ट्रोक'! MP, राजस्थान, छत्तीसगडमध्ये किती फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 09:40 IST

मोफत रेशन योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढविण्याच्या घोषणेने, या तीनही राज्यांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. पण...

देशातील पाच राज्यांत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुढच्याच वर्षात देशभरात लोकसभा निवडणुकाही होत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 80 कोटी लोकांना दिवाळीचे स्पेशल गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्ग येथील प्रचारसभेत मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढविण्याची घोषणा केली आहे. 

कोरोना महामारीच्या काळात 30 जून 2020 रोजी या योजनेला सुरुवात करण्यात आली होती आणि वेळोवेळी या योजनेचा कालावधी वाढविला जात होता. मात्र आता पंतप्रधानांच्या, पाच वर्षांपर्यंत ही योजना सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे भाजपला निवडणुकांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, केवळ मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड नाही, तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही हा मास्टरस्ट्रोक सिद्ध होऊ शकतो.

निवडणुकीत मिळेल मोफत रेशन योजनेचा फायदा? -छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत रेशन योजनेचा कालावधी वाढविण्याची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे, पुढील आढवड्यात दिवाळी आणि मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणुकीची रणधुमारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर, "लोकांचे स्वप्न पूर्ण करणे, हा मोदीचा संकल्प आहे. यामुळे गरीबांचा पैसा वाचेल आणि ते याचा वापर इतर काही आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी करतील," असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

किती होणार फायदा? -मध्येप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, या तीनही राज्यांतील 50 टक्क्यांहून अधिक जनतेला मोफत रेशन योजनेचा लाभ मिळतो. आकडेवारीत बोलायचे झाल्यास, मध्य प्रदेशातील जवळपास 4.82 कोटी, छत्तीसगडमधील जवळपास 2 कोटी आणि राजस्थानातील जवळपास 4.4 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ मिळतो. 

आता, मोफत रेशन योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढविण्याच्या घोषणेने, या तीनही राज्यांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. कारण या योजनेचा या राज्यांतील कोट्यवधी लोकांना थेट फायदा मिळणार आहे. मात्र, काँग्रेसचे सरकार असलेल्या राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये राज्य सरकारच्याही बऱ्याच मोफत योजना राबविल्या जात आहेत. यामुळे जनता कुणाच्या पारड्यात मत टाकणार? हे 3 डिसेंबरच्या निवडणूक निकालानंतरच समोर येऊल.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३chhattisgarh assembly electionछत्तीसगड विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपा