शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

फ्री बर्गर पडलं महागात; तरूणाच्या पोटाच्या आतील भागात झाली इजा

By admin | Updated: July 10, 2017 09:57 IST

जास्त बर्गर खाल्ल्याने त्या विद्यार्थ्याच्या पोटातील आतला भाग फाटल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10-  एखादी वस्तू कमी किंमतीत किंवा फ्री मिळणार असेल तर त्याकडे लोकांचा नेहमीच जास्त कल असतो. पण फ्री मिळणारी वस्तू लोकांना कधीकधी जास्त महागातही पडते. याचं उदाहरण नवी दिल्लीमध्ये पहायला मिळालं आहे. तेथिल एका रेस्टॉरन्टमध्ये चिली बर्गर खायची शर्यत भरविण्यात आली होती. सगळ्यात जास्त बर्गर खाणाऱ्याला त्या रेस्टॉरन्टमध्ये एक महिन्याचं जेवण फ्री दिलं जाइल, अशी खास ऑफर ठेवण्यात आली होती. या शर्यतीत दिल्ली विद्यापिठाच्या एका विद्यार्थ्यांने बाजी मारली. पण क्षमतेपेक्षा जास्त बर्गर खाल्ल्याने त्या विद्यार्थ्याच्या पोटातील आतला भाग फाटल्याची घटना घडली आहे. यामुळे त्या विद्यार्थ्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करावी लागली तसंच त्याला लिक्विड डाएटवर रहावं लागलं. 
 
राजोरी गार्डनजवळच्या एका रेस्टॉरन्टमध्ये झालेल्या बर्गर खाण्याच्या स्पर्धेत मी माझ्या मित्रांसह सहभाग घेतला होता. सगळ्यात जास्त बर्गर मी खाल्ले पण दुसऱ्याच दिवशी मला पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या. त्यानंतर रक्ताच्या उलट्याही सुरू झाल्या. डॉक्टरांकडे गेल्यावर चिली बर्गरमुळे हे सगळं होत असल्याचं समजलं, अशी माहिती दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी गर्व गुप्ता याने दिली आहे. 
 
गर्व जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला तेव्हा त्याची परिस्थिती पाहून डॉक्टरसुद्धा हैराण झाले होते. डॉक्टर दीप गोयल यांनी सांगितलं की, त्या मुलाच्या पोटातील आतलं अस्तर फाटलं असल्याचं एन्डोस्कोपी केल्यावर समजलं. पोटाच्या आतील अस्तराचा जेवढा भाग फाटला आहे तो शस्त्रक्रीया करून काढून टाकला आहे. तसंच उरलेल्या भागावर औषधांच्या सहाय्याने उपचार सुरू आहेत. पोटाच्या आतील अस्तर फाटल्याने ते उपचाराने ठीक करणं शक्य नव्हतं म्हणूनच त्याला बाहेर काढावं लागलं, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. 
 
आणखी वाचा
 

गरिबीला कंटाळून महिलेने 5 हजारात केला पोटच्या मुलीचा सौदा

नागपूर वेणा जलाशय दुर्घटनेपूर्वी तरुणांनी केलं होतं फेसबुक लाईव्ह

अबब! तुमच्या जिओचा डेटा होतोय हॅक ?

डॉक्टर गोयल यांच्या माहितीनुसार, पोटाच्या आतील अस्तर पोटाला सुरक्षा देत असतं त्यामुळे त्याला प्रोटेक्टिव्ह लायनिंगही म्हंटलं जातं. पोटाचं विकारांपासून संरक्षण करण्याचं काम याद्वारे केलं जातं. आतील अस्तर खराब झाल्याने पोटाच्या आत अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच पोटाच्या आतील अस्तर (इनर लायनिंग)चं कार्य योग्य होणं गरजेचं आहे. 

चिली बर्गर आंबट आणि तिखट अशा दोन्ही चवीचं असतं, त्यामुळे अॅसिडीटी मोठ्या प्रमाणात होते. अती प्रमाणात चिलीचं सेवन केल्याने पोटाच्या आतील भागावर त्याचा थेट परिणाम होतो. विशेष म्हणजे पहिल्यांदा चिली बर्गर खाण्याने पोटाच्या आतील अस्तर फाटल्याचा प्रकार घडला आहे, असं डॉक्टर दीप गोयल यांनी सांगितलं आहे.