शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

काळजी घ्या! राम मंदिर दर्शनाच्या नावाखाली फसवणूक; ऑनलाईन फ्रॉडपासून सावध रहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:35 IST

अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्यानावाखाली फसवणूक होत असल्याचे दिसत आहे.

अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा झाला. अनेकांना रामललाचे दर्शन घ्यायचे आहे. ऑनलाईन दर्शन देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तंत्रज्ञानाचे युग आहे, कोणत्याही कार्यक्रमाला जायचे असेल तर प्रवेश पासही ऑनलाइन उपलब्ध आहेत. अयोध्येच्या राम मंदिराच्या दर्शनासाठी व्हीआयपी एंट्री पास देण्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. भारत सरकारच्या सायबर सुरक्षा हँडल सायबरने लोकांना या फसवणुकीबद्दल सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

अनेक अहवालांमध्ये लोकांनी दावा केला आहे की, त्यांना राम मंदिराच्या अभिषेकसाठी व्हीआयपी एंट्री पाससाठी आमंत्रण संदेश मिळाले आहेत. यामागे सायबर गुन्हेगार असल्याचे मानले जात आहे, जे राम मंदिराच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यासाठी असं केले जात आहे. सोशल मीडियावरील अशा मेसेज किंवा लिंकपासून सावध राहण्याचा सल्ला सायबर फ्रेंडने दिला आहे.

अयोध्येत जमिनीचे भाव गगनाला भिडले! 35 लाखांच्या जमिनीची किंमत आता 'इतके' कोटी

व्हीआयपी एंट्री पास मिळवण्यासाठी सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज आणि लिंक पाठवत आहेत. याशिवाय अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करण्याची विनंतीही केली आहे. सरकारी सायबर सुरक्षा हँडल सायबर दोस्तने एक्सवर एक मनोरंजक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे, यामध्ये 'अयोध्येला जायचे होते, सायबर क्राइम पोलिस स्टेशन गाठले' असे लिहिले आहे. 

ऑनलाईन लिंकवर क्लिक करणे टाळा

सायबरने या फोटोच्या माध्यमातून रामलला दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीत अडकल्यास तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चूक झाल्यास सायबर सेलची मदत घ्या आणि सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा, असंही म्हटले आहे.

प्रवेश पास मिळवण्यासाठी फसवणूक करणारे फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात, असा इशारा सायबरने दिला. पोस्टमध्ये, लोकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि अनोळखी नंबर किंवा वेबसाइटवर पैसे भरणे टाळावे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. अयोध्येच्या नवीन मंदिराचे दरवाजे २३ जानेवारीपासून दर्शनासाठी उघडणार आहेत. राम भक्त दिवसातून दोनदा मंदिरात जाऊ शकतात - सकाळी ७ ते ११:३० आणि दुपारी २ ते संध्याकाळी ७. आरतीसाठी राम मंदिर ट्रस्टने जारी केलेला पास असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरfraudधोकेबाजी