शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कस्टमर केअर नंबर्सवर आळा घालणार, सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 09:33 IST

Fraud Customer Care Numbers : अनेकवेळा ग्राहक आपली तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करतात आणि त्यांना फसवले जाते. असे बनावट कस्टमर केअर नंबर्समुळे होते. 

नवी दिल्ली : आजकाल बनावट ग्राहक सेवा क्रमांक (Customer Care Number)  बनवण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता केंद्रातील मोदी सरकारने यावर लगाम घालण्याची तयारी सुरू केली आहे. अनेकवेळा ग्राहक आपली तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करतात आणि त्यांना फसवले जाते. असे बनावट कस्टमर केअर नंबर्समुळे होते. 

गुगलवर असे अनेक फेक नंबर (Fake Numbers) आहेत, जे स्वतःला कोणत्याही बँक, कंपनी किंवा मोबाईल कंपनीचे कस्टमर केअर असल्याचा दावा करतात, त्यावर कॉल केल्यास तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. आता सरकार अशा सर्व बनावट कस्टमर केअर नंबर्सना लगाम घालण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने सर्व कंपन्या आणि अ‍ॅप्सना त्यांचे योग्य कस्टमर केअर नंबर्स फक्त प्लॅटफॉर्मवर ठेवण्यास सांगितले आहे. याशिवाय, प्लॅटफॉर्मवरील सर्व नंबर्स काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्लॅटफॉर्मवरून सर्व नंबर्स हटवले जातीलग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकार या बनावट कस्टमर केअर नंबर्सवर नियंत्रण ठेवण्याची तयारी करत आहे. हे बनावट कस्टमर केअर नंबर्स सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवले जातील. त्याचवेळी, सरकारच्या सर्व अॅप्स आणि प्लॅटफॉर्मना त्यांच्या बनावट कस्टमर केअर नंबर्सची पडताळणी करण्यास सांगितले जाईल. पोर्टलवर फक्त खरे नंबर्स उपलब्ध असतील.

स्पॅम कॉल्सवर बंदीकेंद्र सरकारच्या या पावलामुळे योग्य कस्टमर केअर नंबर्स (Customer Care Number) ओळखला जाईल. केंद्र सरकार यासाठी सर्व अ‍ॅप्स आणि उद्योगांशी चर्चा करणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या दूरसंचार विधेयकात याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

अशा नंबर्सबाबत व्हा सतर्क!गुगलवरून (Google) सर्च करून तुम्ही कधीही कस्टमर केअर नंबर्सता वापर करू नये. तुमच्या कोणत्याही समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या कस्टमर केअर नंबर्सचा नेहमी वापर करा.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानgoogleगुगल