शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणात जेजेपीची चौथी यादी जाहीर, आतापर्यंत ७२ उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 05:07 IST

चंदीगड : जननायक जनता पार्टीने (जेजेपी) हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी आपली ३० उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. पक्षाचे नेते ...

चंदीगड : जननायक जनता पार्टीने (जेजेपी) हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी आपली ३० उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. पक्षाचे नेते दुष्यंत चौटाला हे उचाना कलान येथून निवडणूक लढणार आहेत आणि पुन्हा एकदा भाजपच्या विद्यमान आमदार प्रेम लता यांच्याशी लढत देणार आहेत.२०१४ च्या निवडणुकीत प्रेम लता यांनी दुष्यंत यांचा ७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. हरियाणात २१ आॅक्टोबर रोजी निवडणुका होणार आहेत. जींद जिल्ह्यातील उचाना कलान हा माजी कें द्रीय मंत्री बीरेंद्र सिंह यांचा गड राहिलेला आहे. यापूर्वी पाच वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. दुष्यंत यांचा यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे बृजेंद्र सिंह यांच्याकडून पराभव झाला होता. बृजेंद्र हे प्रेम लता आणि बीरेंद्र सिंह यांचे चिरंजीव आहेत.बीरेंद्र सिंह आणि चौटाला यांचे कुटुंबियात अशा प्रकारे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. ओ. पी. चौटाला यांनी २००९ मध्ये उचाना कालान या मतदारसंघातून बीरेंद्र सिंह यांना ६२१ मतांनी पराभूत केले होते. दुष्यंत आणि बीरेंद्र सिंह दोघेही राज्यातील प्रमुख जाट समुदायाचे आहेत. जींद जिल्हा हा हरियाणाचे राजकीय केंद्र समजला जातो. जेजेपीने जाहीर केलेल्या यादीत माजी आमदार अर्जुन सिंह यांचेही नाव आहे. त्यांना जगाधरीतून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने मंगळवारी २० उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत पक्षाने ७२ उमेदवारांची यादी जाहीर केलीआहे. (वृत्तसंस्था)जेजेपीने जाहीर केलेल्या ३० जणांच्या यादीत बीएसएफचे माजी जवान तेज बहादूर यादव यांचाही समावेश करण्यात आला आहे. करनालमधून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली असून, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध ते मैदानात असतील. यादव यांना २०१७ मध्ये बीएसएफमधून बरखास्त करण्यात आले होते. कारण, सैनिकांना देण्यात येणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

टॅग्स :HaryanaहरयाणाPoliceपोलिस