चंदिगढ/नवी दिल्ली: कोरोनामुळे पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४ वर पोहोचलीय. याआधी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रात कोरोनामुळे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पंजाबमध्ये एका ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वीच जर्मनीहून इटलीमार्गे परतली होती. पंजाबमधल्या नवानशहर जिल्ह्यातल्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. छातीत तीव्र वेदना होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनामुळे जगभरात ९,११५ जणांचा मृत्यू झालाय. यातील सर्वाधिक मृत्यू चीनमधले आहेत. चीनच्या वुहानमधूनच कोरोना जगभरात पसरला. चीन, इटली आणि इराणमध्ये आतापर्यंत ७ हजार ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. बुधवारी (काल) एकट्या इटलीत कोरोनामुळे ४७५ जणांचा मृत्यू झाला. जगभरात आतापर्यंत २ लाख १९ हजार ३२ जणांना कोरोनाची लागण झालीय. तर भारतात १७१ जणांचा कोरोनाचा संसर्ग झालाय. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वाधिक ४९ जणांचा समावेश आहे.
Coronavirus: कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 18:00 IST
Coronavirus कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रापाठोपाठ पंजाबमध्येही कोरोनाचा बळी
Coronavirus: कोरोनाचा चौथा बळी; पंजाबमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
ठळक मुद्देकोरोनामुळे आतापर्यंत देशात चार जणांचा मृत्यूपंजाबमध्ये ७२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यूजगात कोरानामुळे मृत पावलेल्यांची संख्या ९ हजारांपेक्षा जास्त