शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह नेण्यासाठी चौदा हजार; रुग्णवाहिका चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:29 IST

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने दिवसेंदिवस नवीन रुग्णांसोबत मृतांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे, अशा संकटातही मृतांच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे प्रकार समोर येत आहेत.

नवी दिल्ली : कोविड-१९ मुळे  मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी १४ हजार रुपयांचे भाडे आकारणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकाला अटक करण्यात आली आहे. 

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने दिवसेंदिवस नवीन रुग्णांसोबत मृतांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे, अशा संकटातही मृतांच्या टाळूंवरील लोणी खाण्याचे प्रकार समोर येत आहेत. अवघे सहा किलोमीटर दूर असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी चालक कंधी लाल  भरमसाठ पैसे आकारत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने सापळा टाकला. कॉन्स्टेबल महेशने या चालकाला फोन करुन कोविड-१९ ने मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह न्यू लाईफ इस्पितळातून निगम बोध घाटात न्यायचा आहे, असे कळविले. चालक कंधी लालने १४ हजार रुपये लागतील, असे सांगत पैशासाठी चिठ्ठी पाठविली. 

फक्त सहा कि.मी.साठीn    लाईफ इस्पितळ ते निगम बोध घाटदरम्यानचे अंतर फक्त सहा किलोमीटर आहे. एवढ्यासाठी हा रुग्णवाहिका चालक खूप पैसे आकारत असल्याचे आढळले, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वायव्य) गुरीकबाल सिंग संधू यांनी सांगितले. चालक कंधी लाल हा जमुना बाजारचा रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्ली