शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

९० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला चिमुरडा; ७ तासांनंतरही पोहोचली नाही NDRF टीम; अन् मग.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:48 IST

A four year old boy at the newly dug borewell : दोरीच्या सहाय्याने पाण्याची बाटली पाठविली गेली, त्यानंतर मुलाने पाणी प्याले.

(Image Credit- Bhaskar.com)

गुरुवारी जालोर जिल्ह्यातील सांचोर उपविभागातील लछडी गावात एक चार वर्षांचा मुलगा नव्याने खोदलेल्या बोअरवेलमध्ये पडला. ९० फूट खोल खोदलेल्या बोअरवेलचे तोंड लोखंडाच्या वायरने  झाकले होते. तिथेच मुलगा खेळत होता. या दरम्यान तो घसरुन आत पडला. माहिती मिळताच उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  गुजरातमधील एनडीआरएफ टीमला बोलविण्यात आले आहे.

मुलगा काहीतरी इशारे करत असल्याचं दिसून आलं पण काय बोलतोय हे कळलं नाही. त्यानंतर बोअरवेलमध्ये कॅमेरा टाकण्यात आला. दोरीच्या सहाय्याने पाण्याची बाटली पाठविली गेली, त्यानंतर मुलाने पाणी प्याले. खेदजनक गोष्ट म्हणजे ७ तासांनंतरही एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचू शकली नाही. गावकरी या चिमुरड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. 

अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

दैनिक भास्करनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना लाछडी गावातल्या नागाराम देवासी यांच्या शेताची आहे. जिथे नवीन बोअरवेलचे उत्खनन करण्यात आले. वरून वायरने बोअरवेल झाकलेला होता. आज सकाळी दहाच्या सुमारास नागाराम यांचा चार वर्षाचा मुलगा अनिल आतून बोअरवेल पाहण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी संतुलन बिघडल्याने तो आत गेला. जवळच उभं असलेलं एक कुटुंब त्याला खाली पडताना पाहून मोठ्याने ओरडलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

थोड्याच वेळात मोठी गर्दी घटनास्थळी जमली. याबाबत प्रशासन व पोलिसांना कळविण्यात आले. उपविभागीय अधिकारी भूपेंद्र यादव, तहसीलदार देसलाराम, ब्लॉक वैद्यकीय अधिकारी ओमप्रकाश सुथार, पोलिस उपअधीक्षक वीरेंद्र सिंह, ठाणे अधिकारी प्रवीण आचार्य, सरपंच दिनेश राजपुरोहित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताबडतोब ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आणि नळीद्वारे बोअरवेलमध्ये ऑक्सिजन सोडण्यास सुरवात केली.

प्रशासनाकडच्या संसाधनांच्या अभावामुळे या मुलाला बाहेर काढण्याची मोहीम अद्याप सुरू झालेली नाही. एनडीआरएफची टीम गांधी धाम येथून बोलविण्यात आली आहे. असा अंदाज आहे की त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास चार तास लागतील. यानंतर, खर्‍या अर्थाने मदतकार्य सुरू होईल. सध्या जेसीबीच्या मदतीने उत्खनन करण्याबाबत विचार केला जात आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातSocial Mediaसोशल मीडिया