शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नसबंदी जिवावर बेतली; चार महिलांचा मृत्यू, सात महिला गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 08:42 IST

DPL हा महिला नसबंदी कार्यक्रम आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील सरकारी रुग्णालयात 25 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तेलंगानामध्ये खळबळ उडाली आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच दिवसांत चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर ९ महिलांची प्रकृती गंभीर बनली आहे, त्यांच्यावर हॉस्पटलमध्ये उपचार सुरु आहेत. या सर्व महिलांची पाच दिवसांपूर्वी डबर पंक्टर लेप्रोस्कोपी शिबिरात नसबंदी करण्यात आली होती.

हे ऑपरेशन खुपच कमी वेळेचे आणि साधे असते. ऑपरेशन झाल्यावर काही तासांतच महिलेला घरी जाऊ दिले जाते. तसेच त्या नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे करू शकतात. अशा ऑपरेशनमुळे मृत्यू झाल्याने आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. तसेच नसबंदीनंतर मृत्यू झाल्याने यापुढे कोणी त्यासाठी धजावेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

DPL हा महिला नसबंदी कार्यक्रम आहे. रंगा रेड्डी जिल्ह्यातील इब्राहिमपट्टणम येथील सरकारी रुग्णालयात 25 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 34 महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी चार महिलांचा मृत्यू झाला आहे. या महिलांनी गॅस्ट्रोएन्टेरिटिससह अनेक लक्षणे सांगितली होती, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य संचालक जी श्रीनिवास राव यांनी सांगितले.मृत पावलेल्या महिलांना उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि शस्त्रक्रियेनंतर अतिसार सारखा त्रास होऊ लागला होता. अवयव निकामी झाल्याने महिलांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या सर्व महिलांचे वय 22 ते 36 वर्षे होते.  

शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे. चार महिलांच्या मृत्यूनंतर इतर 30 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 7 महिलांना खबरदारी म्हणून शहरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांवर येथील शासकीय निजाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरू आहेत, असे राव म्हणाले. 

टॅग्स :doctorडॉक्टर