शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:45 IST

आता राज्याबाहेर सीईटी केंद्र नसेल- तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधि अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांमध्ये बिहारच्या पाटणा शहरातील चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाल्यानंतर शिक्षण वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा निकाल महाराष्ट्र सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये गैरप्रकार झाल्याची शक्यता लक्षात घेऊन आता संपूर्ण प्रकरणाची  गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.

२०२४-२५ मध्ये एमबीएच्या सीईटीत परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे प्रकरण घडले होते. त्यावेळी देखील महाराष्ट्राबाहेरील सीईटी परीक्षा केंद्रांवर घोटाळा झाला होता. मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्याबाहेरील ४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाल्याने गैरप्रकाराचा संशय पुन्हा बळवला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे महाराष्ट्राबाहेर सीईटी कक्षाचे एकही केंद्र नसेल, असा ठोस निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला आहे.

गुन्हे अन्वेषण विभाग करणार कसून तपास

  • ४ जूनला विधि अभ्यासक्रमाच्या एमएएच- एलएलबी सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये बिहार राज्यातील पाटणा शहरातील ‘माही इन्फोटेक’ नावाच्या परीक्षा केंद्रावरून परीक्षा देणाऱ्या संस्कृती सौंदर्या, प्रखर ज्योती, हिमांशू जायसवाल, विश्वेश पाठक या चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले. या विद्यार्थ्यांची आता चौकशी होणार आहे.
  • एकाच परीक्षा केंद्रावर जेव्हा केवळ चार विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळतात, तेव्हा ही  बाब अतिशय गंभीर आहे, असे म्हणत महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण प्रकरणाची चौकशी तर होईलच, शिवाय राज्याबाहेर आता यापुढे कोणतेच परीक्षा केंद्र मंजूर केले जाणार नाही, अशी घोषणादेखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
टॅग्स :examपरीक्षाchandrakant patilचंद्रकांत पाटील