ईशान्य दिल्लीतील दयालपूर पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एक इमारत कोसळून मोठा अपघात झाला. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास, येथील शक्ती विहार परिसरात असलेली एक चार मजली इमारत कोसळली. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
इमारत कोसळली तेव्हा सुमारे २४ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चांदनी, दानिश, रेश्मा आणि नवीद अशी मृतांची नावे आहेत. सध्या १८ जणांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता आहे.
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
एनडीआरएफ, डॉग स्क्वॉड, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या टीम मदत आणि बचाव कार्य करत आहेत. इमारत जुनी किंवा जीर्ण नव्हती, चांगल्या स्थितीत होती, परंतु भूखंड 'एल' आकारात होता जो इमारत कोसळण्याचे कारण असू शकतो, असं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,'आम्हाला पहाटे २:५० वाजता घर कोसळल्याची माहिती मिळाली. ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्हाला आढळले की संपूर्ण इमारत कोसळली होती आणि लोक ढिगाऱ्याखाली अडकले होते. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत.