शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं! घराला आग लागून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 12:18 IST

Four person found dead after fire broke out : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होरीलाल हे कुटुंब राहत होतं. पण आगीत त्यांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये मंगळवारी जुनी सीमापुरी भागात एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या भयंकर घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाला पहाटे चार वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि तासाभरात त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र अग्निशमन दलाचे जवान घराच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले असता एका खोलीत कुटुंबातील चारही सदस्य मृतावस्थेत आढळले आहेत. आगीमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होरीलाल हे कुटुंब राहत होतं. पण आगीत त्यांचा मृत्यू झाला आहे. चारही लोक एका छोट्या खोलीत मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये होरीलाल, त्यांची पत्नी रीना, त्यांचा 24 वर्षीय मुलगा आशू आणि 18 वर्षीय मुलगी रोहिणी यांचा समावेश आहे. होरीलाल शास्त्री हे सरकारी कर्मचारी होते आणि मार्च 2022 मध्ये ते निवृत्त होणार होते. तर त्यांची पत्नी एमसीडीमध्ये सफाई कामगार होती. आशू बेरोजगार होता तर रोहिणी सीमापुरी येथील सरकारी शाळेत बारावीमध्ये शिकत होती. त्यांचे मृतदेह हे जीटीबी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार सर्वांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. तर चारही जणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रात्री सर्व जण झोपलेले असल्यामुळे घरात आग लागल्याचं समजलं नाही आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे घटनेच्या सखोल चौकशीनंतरच समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :delhiदिल्लीfireआग