शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

महिला हल्लाप्रकरणी आणखी चौघांना अटक

By admin | Updated: February 6, 2016 02:50 IST

बंगळुरूयेथे गेल्या रविवारी एका टांझानियाच्या महिलेवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी गुरुवारी रात्री आणखी चार जणांना अटक केली. या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे

बंगळुरू : बंगळुरूयेथे गेल्या रविवारी एका टांझानियाच्या महिलेवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी गुरुवारी रात्री आणखी चार जणांना अटक केली. या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, विदेशी विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची सूचना केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी कर्नाटक सरकारला केली आहे.कार अपघातानंतर संतप्त जमावाने टांझानियाच्या महिलेला बेदम मारहाण करून तिचे कपडे फाडल्याची घटना गेल्या रविवारी घडली होती. या प्रकरणी पाच जणांना गुरुवारीच अटक करण्यात आली होती. आता अटक झालेल्यांची संख्या नऊवर पोहोचल्याची माहिती बंगळुरूचे पोलीस आयुक्त एन.एस. मेघारीख यांनी दिली. या प्रकारणी पोलीस निरीक्षक प्रवीण बाबू आणि कॉन्स्टेबल मंजुनाथ या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बाबू याला तर घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असतानाही कारवाई केली नाही म्हणून मंजुनाथला निलंबित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.ज्या चार जणांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध हल्ला करणे, बेकायदा एकत्र येणे, दंगल माजविणे आणि महिलेचा विनयभंग केल्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.अटक करण्यात आलेला एक जण भाजपचा कार्यकर्ता आहे काय, असे विचारले असता, तो पंचायत सदस्य असल्याचे मेघारीख म्हणाले.दरम्यान, विदेशी विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारने विशेष पथक स्थापन करावे, अशी सूचना कायदामंत्री गौडा यांनी केली. काही विदेशी विद्यार्थ्यांच्या गैरव्यवहाराबाबत स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल गौडा यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली.