चार लाखांची रोकड जप्त

By Admin | Updated: September 23, 2014 05:06 IST2014-09-23T05:06:09+5:302014-09-23T05:06:09+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे जिल्ह्यातील राज्यमहामार्ग, राष्ट्रीय महामार्गावर निवडणूक आयोगाने पथके तैनात केली आहेत

Four lakh cash seized | चार लाखांची रोकड जप्त

चार लाखांची रोकड जप्त

ब्रह्मपुरी (जि़ गडचिरोली): विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे जिल्ह्यातील राज्यमहामार्ग, राष्ट्रीय महामार्गावर निवडणूक आयोगाने पथके तैनात केली आहेत. याच पथकाने ब्रह्मपुरीच्या आरमोरी मार्गावरील गांगलवाडी टी-पॉइंटजवळ एका सॅन्ट्रो कार (क्रमांक एमएच- ३३ ए- ३७३) मधून तीन लाख ९० हजार रुपयांची रक्कम जप्त केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
गडचिरोलीवरून आपल्या स्वत:च्या सॅन्ट्रो गाडीने गडचिरोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष रमेश श्रीहरी चौधरी हे नागपूरला जात होते. वीज कंत्राटदार मंगेश खडसे, वाहनचालक व पुन्हा एक मित्र असे चौघे जण त्यांच्यासोबत
होते. त्यांचे वाहन गांगलवाडी टी-पॉइंटजवळ पोहोचताच, तेथे तैनात पथकाने वाहन तपासणीसाठी थांबविले. वाहनात बसून असलेले वीज कंत्राटदार मंगेश खडसे यांच्याजवळ असलेल्या प्लॅस्टिक पिशवीत तीन लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम असल्याचे तपासणीदरम्यान उघडकीस आले. (प्रतिनिधी)

Web Title: Four lakh cash seized