साधुग्राममध्ये चार अग्निशामक केंद्रे कार्यान्वित
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये आगीच्या दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशामक केंद्रे कार्यान्वित आहेत. या अग्निशामक विभागाच्या चार केंद्रांत ३२ कर्मचार्यांसह ४ अग्निशामक बंब सज्ज आहेत.
साधुग्राममध्ये चार अग्निशामक केंद्रे कार्यान्वित
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये आगीच्या दुर्घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी चार अग्निशामक केंद्रे कार्यान्वित आहेत. या अग्निशामक विभागाच्या चार केंद्रांत ३२ कर्मचार्यांसह ४ अग्निशामक बंब सज्ज आहेत. १९ ऑगस्टला होणार्या ध्वजारोहणानंतर प्रत्येक खालशा, आखाड्यामध्ये भोजन बनविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आखाड्यात स्वयंपाकासाठी इंधन म्हणून लाकूड, गॅस यांचा वापर होणार आहे. तसेच खालशामध्ये कापड, लाकडाचा वापर अधिक झाला आहे. त्यासाठी ऐनवेळी उद्भवणार्या आगीच्या समस्येवर मात करण्यासाठी अग्निशामक विभागाचे कर्मचारी महिनाभरापासून साधुग्राममध्ये तळ ठोकून आहेत. सेक्टर ए मध्ये दोन, तर सेक्टर बी मध्ये दोन अग्निशामक बंब आहेत. सध्या एका केंद्रासाठी आठ कर्मचारी काम पाहत आहेत. साधुग्राममध्ये साधू-महंतांकडून अग्नीजवळ तपश्चर्या केली जाते. त्यामुळे आखाडे, खालशांमध्ये आगीच्या दुर्घटना घडू नये यासाठी या विभागामार्फत विशेष काळजी घेतली जात आहे. तसेच आखाड्यांच्या ध्वजारोहणानंतर प्रत्येक खालशामध्ये जाऊन या विभागाचे कर्मचारी तपासणी करणार आहेत. पर्वणी काळात सर्वच यंत्रणांची दमछाक होणार आहे. (प्रतिनिधी) पहिल्याच पर्वणीत ७२ तास ड्यूटी सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या पहिल्याच पर्वणीत अग्निशामक विभागाचे कर्मचार्यांना सलग तीन दिवस (७२ तास) ड्युटी करावी लागणार आहे. तसेच २० ऑगस्टनंतर इतर जिल्ांतून अग्निशामक कर्मचारी दाखल होणार आहेत. साधुग्राममध्ये शाही पर्वणीत साधू-महंतांसह भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यासाठी अग्निशामक यंत्रणेची तयारी दिसून येत आहे.