शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

MDH मसालेचे संस्थापक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन; कोरोनानंतर हृदयविकाराचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 09:10 IST

Mahashay Dharmapal Gulati : 95 वर्षीय धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार होते. अगदी वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असतानाही ते जोशपू्र्ण आणि तंदुरुस्त होते.

देशातील प्रसिद्ध मसाला कंपनी महाशिया दी हट्टी (MDH) चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज पहाटे 5.38 वाजता निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. व्यापार आणि उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मभूषणने सन्मान केला होता. 

गुलाटी यांचा जन्म 27 मार्च, 1923 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. 1947 च्या फाळणीमध्ये ते भारतात आले होते. तेव्हा त्यांच्याकडे केवळ 1500 रुपये होते. भारतात आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी टांगा चालवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी पैसे जमवत दिल्लीच्या करोलबागमध्ये एक मसाल्याचे दुकान उघडले. या एका दुकानावरून त्यांनी देशाची प्रसिद्ध कंपनी उभी केली. आज त्यांच्या एमडीएच कंपनीच्या भारतातच नाही तर दुबईतदेखील फॅक्टरी आहेत. त्यांच्या एकूण १८ फॅक्टरी आहेत. याद्वारे ते जगभरात पोहोचले आहेत. एमडीएचची ६२ उत्पादने आहेत.

5 वी नापास महाशय धर्मपाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानअंगात पांढरा कुर्ता, सोबतीला जॅकेट आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी परिधान केलेला साधारण माणूस टीव्हीवरील जाहिरातीत झळकला. पाहता- पाहता हा माणूस सर्वांचा लाडका बनला. आपल्या कष्टाच्या जोरावर एका मसाला कंपनीला जगभरात मान्यता मिळवून देण्याचं काम या माणसानं केलंय. 'असली मसाले सच सच, एमडीएच एमडीएच'.... अशी जिंगल बेल ऐकली तरी आपल्या डोळ्यासमोर महाशय धर्मपाल यांचा चेहरा उभारतो. एमडीएच मसाला कंपनीचे मालक गुलाटी हे 2 हजार कोटींचे मालक आहेत. केवळ चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या गुलाटी यांनी 2018 मध्ये वर्षाकाठी 25 कोटी रुपये पगार घेतला. 

95 वर्षीय धर्मपाल हे जगातील सर्वात वयोवृद्ध अॅडव्हरटाईज स्टार होते. अगदी वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असतानाही ते जोशपू्र्ण आणि तंदुरुस्त होते. मी सकाळी 4 वाजता उठतो, त्यानंतर नेहरू पार्कमध्ये जाऊन 1000 पाऊले चालतो. पुन्हा घरी येऊन योगासनेही करतो. 'अभी तो मै जवान हूँ, मी म्हातारा नाही, असे धर्मपाल म्हणतात. तर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांची सेवा करा आणि कष्ट करत राहा, असा सल्लाही महाशय धर्मपाल यांनी तरुणाईला दिला होता. 

जोपर्यंत माणूस प्रामाणिक होत नाही, जोपर्यंत माणूस कष्टाळू होत नाही. सर्वांशी गोड बोलणार नाही, तोपर्यंत त्यास देवाचा आशीर्वाद मिळणार नाही. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि देवाची कृपा यामुळेच मी यशस्वी झालो, असे पद्मभूषण पुरस्कारप्राप्त 95 वर्षीय महाशय धर्मपाल हट्टी यांनी म्हटले होते.

टॅग्स :businessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या