शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र हरपला; सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 07:01 IST

१९४७ मध्ये लाहोरहून बीए ऑनर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर टिहरीत ते परतले व टिहरीतील राजवटीविरोधात असलेल्या प्रजा मंडळात सहभागी झाले.

नवी दिल्ली : बहुगुणा यांचे वडील अंबादत्त बहुगुणा टिहरीत वन अधिकारी होते. १३ वर्षांचे असताना अमर शहीद श्रीदेव सुमन यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलली. सुमन यांच्यापासून प्रेरणा घेत ते  बाल्यावस्थेत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यांनी टिहरी राजवटीविरोधात आंदोलन केले. अत्यंत बुद्धिमान असलेले बहुगुणा यांचे शिक्षण टिहरीतील राजकीय प्रताप इंटर काँलेजपासून ते लाहोरपर्यंत झाले.

१९४७ मध्ये लाहोरहून बीए ऑनर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर टिहरीत ते परतले व टिहरीतील राजवटीविरोधात असलेल्या प्रजा मंडळात सहभागी झाले. १४ जानेवारी, १९४८ रोजी राजेशाही उलथून टाकली गेल्यावर ते प्रजामंडळ सरकारमध्ये प्रचार मंत्री बनले. लोकांच्या हितासाठी लढणाऱ्या बहुगुणा यांनी १९८१ मध्ये झाडे तोडण्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी पदमश्री सन्मान घेण्यास नकार दिला. त्यांनी दारूबंदी, पर्यावरण संरक्षण आणि टिहरी धरणाविरोधात १९८६ मध्ये आंदोलन सुरू करून ७४ दिवस उपोषण केले.

पर्यावरणवादी युगाचा अंत -राहुल गांधीसुंदरलाल बहुगुणा यांना त्यांच्या कार्यामुळे येणाऱ्या पिढ्या नेहमी लक्षात ठेवतील, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. गांधी यांनी टेलिग्राम संदेशात म्हटले की, “बहुगुणा यांच्या निधनामुळे देशातील सगळ्यात प्रतिष्ठित पर्यावरणवादी युगाचा अंत झाला आहे. चिपको आंदोलनातील त्यांचे योगदान आगामी पिढ्या लक्षात ठेवतील.”

जागतिक स्तरावर नोंदसुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी दु:ख व्यक्त केले. बहुगुणा यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नायडू ट्विटरवर म्हणाले. हिमालयातील पर्यावरण रचना जपण्यासाठी बहुगुणा यांनी न थकता केलेल्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली. त्यांच्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल, असे नायडू म्हणाले.