शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अवस्थेत आढळले; कलाकार, युवतीला विवस्त्र करत झोडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 07:24 IST

बिहारमधील घटनेवरून मुख्यमंत्री नितीशकुमारांवर भाजपची टीका

पाटणा : बिहारमधील बेगुसराय येथे एक लोककलाकार खोलीमध्ये युवतीसोबत नको त्या अवस्थेत आढळल्याने संतप्त झालेल्या लोकांनी त्यांना विवस्त्र केले व बेदम मारहाण केली. या खळबळजनक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने भाजपने मुख्यमंत्री नितीशकुमार  यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

लोककलाकाराने हार्मोनियम शिकविण्याच्या बहाण्याने या युवतीला आपल्यासोबत आणले होते. गावकऱ्यांनी त्या दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले हाेते. त्या नंतर घडलेल्या घटनेच्या व्हिडीओत लोककलाकार व त्याच्यासोबत असलेल्या युवतीला मारहाण करणारे लोक दिसत असून पोलिसांनी त्यांची ओळख पटविली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदविला. बिहारच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा म्हणाले की, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी बिहारचे पोलिस फारसे सहकार्य करत नाहीत. 

‘बिहार पोलिसांनी अनेक घटना दडपल्या’

विजयकुमार सिन्हा यांनी सांगितले की, एखाद्या महिलेला विवस्त्र करणे अतिशय घृणास्पद घटना आहे. दुसऱ्या राज्यांतील अशा घटनांचा जोरजोरात निषेध करणारे बिहारमधील घटनांबाबत मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा सवालही त्यांनी नितीशकुमार सरकारला विचारला. बिहारमध्ये याआधी अशा घडलेल्या अत्याचाराच्या घटना पोलिसांनीच दडपल्या होत्या, असा आरोपही त्यांनी केला.