शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सोमनाथ चॅटर्जी : संसदीय कामकाजाचे पावित्र्य जपणारा माजी लोकसभाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 06:03 IST

माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांची राजकीय कारकीर्द नाट्यमय होती. ते लोकसभेचे दहा वेळा खासदार होते. कसलेले व नाणावलेले संसदपटू हा नावलौकिक होता.

माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांची राजकीय कारकीर्द नाट्यमय होती. ते लोकसभेचे दहा वेळा खासदार होते. कसलेले व नाणावलेले संसदपटू हा नावलौकिक होता. लोकसभाध्यक्ष झाल्यानंतर निष्पक्षपातीपणे त्यांनी सभागृहाचे कामकाज त्यांनी चालविले. त्यांचे वडील व ख्यातनाम विधिज्ञ निर्मलचंद्र चॅटर्जी हिंदू महासभेचे नेते व माजी अध्यक्ष होते. त्यामुळे मुलगा साम्यवादी विचारांकडे वळणे हे राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचे वळण होते.सोमनाथदांचा जन्म २५ जुलै १९२९ रोजी आसाममधील तेजपूर येथे झाला. वडिल निर्मलचंद्र चॅटर्जी हिंदू महासभेतर्फे १९५२ साली लोकसभेवर निवडून गेले. १९६३ साली ते अपक्ष म्हणून माकपच्या पाठिंब्यावर विजयी झाले. त्यांचे १९७१ साली निधन झाले. त्याचवर्षी सोमनाथ बर्दवान मतदारसंघातून लढून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. पिता-पुत्रांचा हिंदुत्वावादापासून मार्क्सवादाकडचा प्रवास विलक्षणच होता.निवडणुकीत पराभवममता बॅनर्जी यांनी १९८४ साली त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. लोकसभा निवडणुकांत सोमनाथदांचा हा झालेला पहिला व शेवटचा पराभव. सोमनाथ चॅटर्जी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल १९९६ साली सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकसभेत त्यांनी मांडलेले प्रश्न, विविध विषयांवर केलेली भाषणे व घेतलेली रोखठोक भूमिका याची साक्ष देतात. काही संसदीय समित्यांचे अध्यक्ष किंवा सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांचा सर्वच राजकीय पक्षांत आदरयुक्त दबदबा होता. लोकसभाध्यक्षपदाची मुदत २00९ मध्ये संपल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.ज्योती बसूंचे निकटवर्तीयपश्चिम बंगालचे अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविलेले नेते ज्योती बसू यांच्या निकटवर्तीयांमध्ये सोमनाथ चॅटर्जी यांचा समावेश होता. पश्चिम बंगालमध्ये नवीन उद्योग सुरू व्हावेत व गुंतवणूक व्हावी यासाठी ज्योती बसूंनी सोमनाथ चॅटर्जी यांना औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनविले होते. ही कामगिरीही सोमनाथदांनी तेवढ्याच तडफेने पार पाडली. ज्योती बसूंनी मला नेहमीच भक्कम पाठिंबा व प्रोत्साहन दिले, असे सोमनाथ चॅटर्जी म्हणत.अशी सुरू झाली राजकीय कारकीर्दसोमनाथदांचे शालेय शिक्षण मित्रा इन्स्टिट्यूटमध्ये झाले. ते १९५७ साली एमए झाले व इंग्लंडच्या मिडल टेम्पल शिक्षणसंस्थेतून बॅरिस्टरही झाले.घरातच वैचारिक व समाजकार्याचे बाळकडू मिळाले असल्याने वकिली करत राहाण्यात त्यांना रस नव्हता. त्यांनी १९६८ साली माकपमध्ये प्रवेश केला.पुढे २००८ साली पक्षातून हकालपट्टी होईपर्यंत ते माकपचे काम करत राहिले. जनाधार असलेला हा नेता संसदीय कामकाजाचे पावित्र्य कायम जपत होता.

समाजातील गरीब व वंचित गटातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठविला, तसेच संसदीय लोकशाही मजबूत करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. - नरेंद्र मोदीसोमनाथ चटर्जी हे एक संस्थाच होते. सर्व पक्षांच्या खासदारांना त्यांचा विलक्षण आदर वाटत असे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना हे स्थान प्राप्त झाले होते.- राहुल गांधी अत्यंत सहृदयी व्यक्ती, नाणावलेले संसदपटू, सुस्पष्ट भूमिका घेणारे लोकसभा अध्यक्ष अशा अनेक रुपांत त्यांना पाहायला मिळाले होते.- एम. हमीद अन्सारी,माजी उपराष्ट्रपतीसोमनाथ चॅटर्जी यांच्या निधनाने एका महान नेत्याला आपण सारेचजण कायमचे मुकलो आहोत.- ममता बॅनर्जी,प. बंगालसोमनाथदांच्या निधनाने पश्चिम बंगालने पालकच गमावला आहे. त्यांचे निधन हा माकप व देशासाठी मोठा धक्का आहे.- सुजन चक्रवर्ती,माकपचे नेतेकडक शिस्तीचा मार्गदर्शक हरपला - विजय दर्डासोमनाथ चॅटर्जी यांच्या आठवणीने माझे हृदय भरून आले. अनेक बाबतीत ते माझे प्रेरणास्थान होते. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून बजावलेली भूमिका, संसदेत केलेली भाषणे दुर्बलांच्या उत्थानासाठी कार्य आणि त्यांची मानवता स्मरणात राहील. ते या देशाचे खरे सुपूत्र होते. त्यांनी केलेल्या राष्टÑीय कार्यासाठी लोकांकडून त्यांना भरभरून प्रेम मिळाले. संसदेत त्यांनी केलेल्या सुधारणा आणि रुजविलेली शिस्त यामुळे ते सदैव स्मरणात राहतील. त्यांची भाषणे राजकारण आणि समाजकार्याच्या क्षेत्रात योगदान देऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील, अशा शब्दांत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

टॅग्स :Somnath Chatterjeeसोमनाथ चॅटर्जीnewsबातम्या