शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

माजी पंतप्रधान देवगौडा कोरोना पॉझिटीव्ह, PM नरेंद्र मोदींचा डायरेक्ट फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:40 IST

देवगौडा यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना काहीही काळजी न करण्याचं आवाहन केलंय. देवगौडा यांच्या कोरोनाच्या अहवालाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान एचडी. देवगौडा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. मी आणि माझी पत्नी चेनम्मा, आम्हा दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरण कक्षात आहोत. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही देवगौडा यांनी केली आहे.   

देशभरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंगळवारी एका दिवसात राज्यात 27 हजार नऊशेपेक्षा जास्त पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, चाचणीचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे, त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. एकीकडे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून दुसरीकडे रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. त्यातच, आज माजी पंतप्रधान देवगौडा यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. 

देवगौडा यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना काहीही काळजी न करण्याचं आवाहन केलंय. देवगौडा यांच्या कोरोनाच्या अहवालाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. तसेच, देवगौडा व त्यांच्या पत्नीच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली आहे. दरम्यान, मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकमध्ये मंगळवारी कोरोनाचे 2,975 रुग्ण आढळून आले आहेत. तर 1262 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकट्या बंगळुरू शहरात 1,984 रुग्ण आढळून आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीH. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस