शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:13 IST

गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व त्यांनी स्वतःला वेगळे करावे, असे मी आवाहन त्यांनी केलं आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी दुपारी ट्विट करून ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, रुग्णालयात तपासणीसाठी गेलो असता मला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व त्यांनी स्वतःला वेगळे करावे, असे आवाहन त्यांनी केलं आहे.प्रणव मुखर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर त्यांच्यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांच्या चांगल्या तब्येतीसाठी शुभेच्छा दिल्यात. त्यांच्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करून प्रणव मुखर्जी यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही ट्विट करत त्यांना लवकरात लवकर बरे व्हा, अशी प्रार्थना केली आहे. प्रणव मुखर्जी यांचे वय 84 वर्षे आहे, अशा परिस्थितीत वाढत्या वयामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॉंग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. 2019मध्ये केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. देशात कोरोनाचे संकट अतिशय वेगाने पसरत आहे आणि आतापर्यंत बर्‍याच व्हीव्हीआयपी देखील कोरोनाला बळी पडले आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळले होते, त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याव्यतिरिक्त अर्जुन मेघवाल आणि इतर काही केंद्रीय मंत्र्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याशिवाय अनेक राज्य सरकारांच्या मंत्र्यांनाही विषाणूची लागण झाली आहे. नुकतेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. बराच काळ रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. 

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जी