शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus : मनमोहन सिंगांनंतर देवेगौडांचं पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिले महत्वाचे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:05 IST

देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. यातच कोरोनाचा सामना करण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यानंतर, आता माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले आहेत. यात, केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस दिली, तर मानवतेच्या दृष्टीने हा एक चांगला संकेत असेल, असे एचडी देवेगौडा यांनी लिहिले आहे. (Former pm hd deve gowda writes to pm modi and give suggestions On the background of corona virus)

Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांनी नेमके काय म्हटले आहे पत्रात -

  • आरोग्य प्रशासन आणि कोविड व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करायला हवे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी वैद्यकीय व्यावसायिकांना छोट्या करारावर नोकरी देण्याची आवश्यकता आहे. 
  • सर्व जिल्हा मुख्यालयांत वॉर रूम बनविण्याची आवश्यकता. खासगी आणि सरकारी क्षेत्रांत कोरोना सेंटर आणि आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज. 
  • सध्या ग्रामीण भाग, तालुके आणि गावांत कोविड व्यवस्थापनाची तयारी करण्याची गरज लशीसंदर्भातील भ्रम दूर करण्याची आवश्यकता. 
  • निवडून आलेल्या लोकप्रतिनिधिंनी, आपल्या मतदारसंघात पुरेशा लशी आहेत, की नाही याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  
  • देशातील गरीब समुहांना डोळ्यासमोर ठेऊनच लशीची किंमत निश्चित करायला हवी. देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देणे हा मानवतेच्या दृष्टीने चांगला संकेत असेल. 

CoronaVirus : निवडणूक काळातच कोलकात्यात कोरोना स्फोट; प्रत्येक दुसरा व्यक्ती आढळतोय कोरोना पॉझिटिव्ह

  • लस घेण्यासाठी आलेल्या गरीब लोकांना आयडी कार्ड सारख्या समस्येतून मुक्त करायला हवे. इंटरनेट नसणे आणि सरकारी वेबसाइटची माहिती नसणे याचा त्यांच्या लसीकरणावर परिणाम होऊ नये.
  • 12-15 वर्षांच्या मुलांसाठीही व्हॅक्सीनेशन ट्रायल व्हायला हवे. 
  • खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही आरोग्य विमा द्यायला हवा. छोटे नर्सिंग होम आणि ग्रामिण भागांत क्लिनिकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याची आवश्यकता आहे.

CoronaVirus: जेवण नंतर करू, आधी देशासाठी ऑक्सिजन तयार करायचाय...; शेजारीच ठेवलेल्या टिफिनकडेही बघेनात मजूर

  • सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या गर्भवती महिलांना तीन महिन्यांची सुट्टी द्यायला हवी. तसेच वेतनही द्यायला हवे. 
  • ज्या कोरोना योध्याचा या लढाईत मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नौकरी द्यायला हवी.
  • पुढील सहा महिन्यांसाठी मोठ्या सामूहिक हालचालिंवर बंदी घालण्याची आवश्यकता. पुढील सहा महिन्यांसाठी राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुका थांबवायला हव्यात.

 

टॅग्स :h d deve gowdaएच. डी. देवेगौडाNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या