शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींच्या भारतातील जमिनीचा लिलाव; इतक्या कोटींना विकली गेली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:56 IST

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथे लिलाव करण्यात आला

Pervez Musharraf Property In India: पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारतातून मागमूसही पुसला गेला. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथील लिलाव करण्यात आला. या १३ बिघा जमिनीचा लिलाव १ कोटी ३८ लाख १६ हजार रुपयांना झाला आहे. त्याची मूळ किंमत ३९ लाख १६ हजार रुपये ठेवण्यात आली होती.

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा भाऊ आणि कुटुंबीयांच्या जमिनीचा उत्तर प्रदेशातील बागपत येथे लिलाव करण्यात आला. या १३ बिघा जमिनीचा लिलाव १ कोटी ३८ लाख १६ हजार रुपयांना झाला आहे. बागपतच्या कोटाणा गावात असलेली ही जमीन शत्रूची मालमत्ता होती. लिलावाचे पैसे केंद्रीय मंत्रालयाच्या कस्टोडियन ऑफ एनीमी प्रॉपर्टी डिपार्टमेंटच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. परवेज मुशर्रफ  यांचे वडील आणि आई दिल्लीला जाण्यापूर्वी येथे राहत होते. उत्तर प्रदेशातील परवेझ मुशर्रफ यांच्या कुटुंबाची भारतातील ही शेवटची जमीन होती.

लिलावादरम्यान, तीन लोकांनी या मालमत्तेची किंमत १.३८ कोटी रुपये ठेवली आहे. खसरा क्रमांक आठच्या जमिनीची ई-लिलाव प्रक्रिया सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. ही मालमत्ता १० तासांत खरेदी करण्यात आली. शत्रूच्या मालमत्तेची विक्री केल्याने बागपतमध्ये परवेझ मुशर्रफ आणि त्यांच्या कुटुंबातील नूरूचे नाव कायमचे मिटलं गेले  आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, लखनऊमधून ई-लिलाव प्रक्रियेची माहिती बागपत प्रशासनाला देण्यात आली आहे. बागपत येथील पंकज कुमार यांनीही १३ बिघांपैकी सुमारे साडेपाच बिघे जमीन खरेदी केली आहे. शत्रू मालमत्तेचा लिलाव ५ सप्टेंबर रोजी ऑनलाइन झाला. कोटाना गाव हे देखील महत्त्वाचे आहे कारण ते केवळ पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींचे नाही तर त्यांच्या आजोबांचे निवासस्थान देखील होते.

परवेझ मुशर्रफ यांचे वडील मुशर्रफुद्दीन आणि आई बेगम जरीन हे कोटाना गावचे रहिवासी होते. दोघांचा विवाहसुद्धा कोटाणा येथे झाला होता. परवेझ मुशर्रफ आणि त्यांचे बंधू डॉ. जावेद मुशर्रफ यांचा जन्म १९४३ साली दिल्लीत झाला. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते. पण दिल्ली व्यतिरिक्त कोटाणा येथे त्यांच्या कुटुंबाची वाडा आणि शेतजमीन आहे. त्यांच्या भावाच्या जमिनीचा लिलाव झाला आहे.

टॅग्स :Pervez Musharrafपरवेझ मुशर्रफUttar Pradeshउत्तर प्रदेशPakistanपाकिस्तान