नवी दिल्ली - हिंदू देवी-देवतांबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे आपचे बडे नेते आणि माजी आमदार जर्नेल सिंग यांना महागात पडले आहे. जर्नेल सिंग यांच्या फेसबूक पोस्टवरून वाद वाढल्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे. जर्नेल सिंग यांनी राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच त्यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली होती. दरम्यान, आता आपने या प्रकरणाचा तपास होईपर्यंत जर्नेल सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले आहे.
हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह विधान, आपने बड्या नेत्याचे केले पक्षातून निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 11:14 IST
आपचे माजी आमदार जर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यानंतर जर्नेल सिंग यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह विधान, आपने बड्या नेत्याचे केले पक्षातून निलंबन
ठळक मुद्दे हिंदू देवी-देवतांबाबत फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे आपचे बडे नेते आणि माजी आमदार जर्नेल सिंग यांना महागात आम आदमी पक्षाने जर्नेल सिंग यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केलेजर्नेल सिंग यांनी ११ ऑगस्ट रोजी फेसबूकवर हिंदू देवी-देवतांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती