शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या मित्राला मोठा सन्मान, शिंजो आबेंना पद्मविभूषण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 22:54 IST

Former Japan PM Shinzo Abe : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्देआज जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. बी. एम. हेगडे, नरिंदर सिंह कापन्य, मौलाना वहिदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहो यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यात ७ जणांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिंजो आबे हे जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध वृद्धिगंत करण्यास शिंजो आबे यांचा मोठा वाटा आहे. तसेच, २०१७ मध्ये जपानचे पंतप्रधान असताना शिंजो आबे हे भारतात आले होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर त्यांचे स्वागत केले होते. शिंजो आबे यांची गळाभेट घेत नरेंद्र मोदींनी त्यांचे स्वागत केले होते. 

याचबरोबर, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी जपानच्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंजो आबे यांनी नरेंद्र मोदी हे सर्वात विश्वासू मित्र असल्याचे मत व्यक्त केले होते. "मोदी अत्यंत विश्वासू मित्र आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारत जगात एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून उदयाला येत आहे. त्यांचे जपानमध्ये स्वागत करणे, हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे', असे शिंजो आबे यांनी म्हटले होते. 

गेल्या वर्षी शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे शिंजो आबे यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली होती. शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे शब्द काळजाला भिडले असल्याचे सांगत भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी वृद्धिगंत होतील, असा विश्वासही शिंजो आबे यांनी व्यक्त केला होता. 

दरम्यान, पद्म पुरस्कारांमध्ये उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंताना सन्मान जाहीर झाला आहे. या पद्म पुरस्कारात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. बी. एम. हेगडे, नरिंदर सिंह कापन्य, मौलाना वहिदुद्दीन खान, बी. बी. लाल, सुदर्शन साहो यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर समाजसेविका सिंधुताई सपकाळ, पुरुषोत्तम गंगावणे, नामदेव कांबळे, जयंतीबेन पोपट, गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

टॅग्स :Shinzo Abeशिन्जो आबेNarendra Modiनरेंद्र मोदी