शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

माजी उपमुख्यमंत्र्याची पक्ष सोडण्याची घोषणा, सर्वांसमोर रडले आमदार; तिकीटावरून कर्नाटक भाजपमध्ये घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 23:24 IST

भाजपने यावेळी तिकिट न दिल्याने अनेक नेत्यांमध्ये आक्रोश दिसत आहे. कुणी थेट पक्ष बदलण्याची भाषा करत आहेत, कुणी रडत आहेत, तर कुणी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीसंदर्भात बोलत आहेत. यामुळे भाजप समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र ही यादी जाहीर झाल्यापासून पक्षातच एक प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. अनेक नेत्यांमध्ये आक्रोश दिसत आहे. कुणी थेट पक्ष बदलण्याची भाषा करत आहेत, कुणी रडत आहेत, तर कुणी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीसंदर्भात बोलत आहेत. यामुळे भाजप समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

पहिली यादी जाहीर होताच भाजपत घमासान- कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी भाजपने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांचेही तिकीट कापले आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांना काँग्रेसमध्ये जाण्यासंदर्भात विचारले असता, लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. आता महत्वाचे म्हणजे, यावेळी भाजपने अथनी येथून महेश कुमाथली यांना तिकीट दिले आहे. कुमाथली यांनीच 2019 मध्ये काँग्रेसचे सरकार पाडत भाजपचे सरकार स्थापन केले होते.

कुणाच्या डोळ्यात पाणी - भाजपने यावेळी उडपीचे आमदार रघुपती भट्ट यांनाही तिकीट दिले नाही. यामुळे ते भावूक झाले. महत्वाचे म्हणजे, हा निर्णय टीव्हीच्या माध्यमाने समजल्याने ते ते अधिक दुःखी झाले आहेत. ते म्हणाले, जर आपल्याला आपल्या जातीमुळे तिकिट दिले गेले नसेल, तर आपण हे स्वीकार करू शकत नाही. 

ईश्वरप्पा यांच्या निवडणूक राजकारणातील निवृत्तीने टेन्शन वाढलं - पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वतःहून समोर येत राजीनामा दिला आहे. शिवमोगामध्ये तर राजीनाम्यांची लाईन लागली आहे. येथे महापालिकेच्या 19 सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. महापौर आणि उपमहापौर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवमोगाच्या जिल्ह्या अध्यक्षांनीही ईश्वरप्पा यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. याशिवाय इतरही काही नेते राजीनामा देण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. याशिवाय, जगदीश शेट्टार यांनाही यावेळी भाजपने तिकिट दिलेले नाही.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी