शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अनंतात विलीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 16:51 IST

अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची उपस्थिती

नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निगमबोध घाटावर त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्यावेळी अनेक दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते. दीक्षित यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वसामान्य दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती. काल शीला दीक्षित यांनी एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. तब्बल १५ वर्षे दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शीला दीक्षित यांना दिल्लीकरांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. शीला दीक्षित या केवळ नेत्या नव्हत्या. तर ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यांची कमतरता कायम जाणवेल, अशा शब्दांमध्ये यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या काही दिवसांपासून दीक्षित यांची प्रकृती गंभीर होती. काल एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचं पार्थिव निजामुद्दीन भागातील निवासस्थानी आणण्यात आलं. आज सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं.  

टॅग्स :congressकाँग्रेस