कोळसा घोटाळ्यात हात काळे, माजी कोळसामंत्री दिलीप रे यांना 3 वर्षांची शिक्षा

By महेश गलांडे | Published: October 26, 2020 11:34 AM2020-10-26T11:34:40+5:302020-10-26T11:42:36+5:30

दिलीप रे यांना काही दिवसांपूर्वीच कोळसा घोटाळासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. सन 1999 साली झारखंडच्या कोळसा विभागातील तथाकथिक अनियमितता आणि घोटाळाप्रकरणी न्यायालयानेही ही शिक्षा सुनावली आहे.

Former Coal Minister Dilip Ray sentenced to 3 years in jail, by CBI special court | कोळसा घोटाळ्यात हात काळे, माजी कोळसामंत्री दिलीप रे यांना 3 वर्षांची शिक्षा

कोळसा घोटाळ्यात हात काळे, माजी कोळसामंत्री दिलीप रे यांना 3 वर्षांची शिक्षा

Next
ठळक मुद्देदिलीप रे यांना काही दिवसांपूर्वीच कोळसा घोटाळासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. सन 1999 साली झारखंडच्या कोळसा विभागातील तथाकथिक अनियमितता आणि घोटाळाप्रकरणी न्यायालयानेही ही शिक्षा सुनावली आहे

मुंबई - सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कोसळा घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीयमंत्री दिलीप रे यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. रे यांच्यासह इतर दोन दोषींनाही तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. झारखंड कोळसा विभागातील तथाकथित अनियमितता आणि घोटाळ्यासंबंधी हे प्रकरण आहे. दिलीप रे हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कोळसा राज्यमंत्री होते.

दिलीप रे यांना काही दिवसांपूर्वीच कोळसा घोटाळासंबंधी एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले होते. सन 1999 साली झारखंडच्या कोळसा विभागातील तथाकथिक अनियमितता आणि घोटाळाप्रकरणी न्यायालयानेही ही शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी दिलीप रे यांना भ्रष्टाचार अधिनियम अंतर्गत दोषी करार दिला आहे. तर, इतर दोघांना फसवणूक आणि कट रचण्याच्या हेतुने दोषी ठरवले आहे. 

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलीप रे यांच्यासह कोळसा मंत्रालयातील तत्कालीन दोन वरिष्ठ अधिकारी प्रदीप कुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम यांना दोषी ठरवले आहे. तसेच, केस्ट्रोन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (सीटीएल) चे महाव्यवस्थापक महेंद्र कुमार अग्रवाल आणि कॅस्ट्रॉन मायनिंग लिमिटेडलाही दोषी ठरविले आहे. 

Web Title: Former Coal Minister Dilip Ray sentenced to 3 years in jail, by CBI special court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.