शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सावध राहण्याचा इशारा; ट्राेलिंगद्वारे निकालावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 08:28 IST

काॅलेजियम पद्धतीबाबत गैरसमज आहेत. मात्र, न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेचा प्राधान्याने विचार करायला हवे, असे न्या. चंद्रचूड म्हणाले.

नवी दिल्ली : साेशल मीडियाचा वापर करुन काही विशेष हित समुहांकडून न्यायालयाच्या निकालांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यायाधीशांनी त्यापासून सावध राहायला हवे, असा इशारा माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला. राज्यघटनेशी संबंधित एका कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

न्या. चंद्रचूड म्हणाले की, काही विशेष हित समूह दबाव आणून निकाल प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. काेणत्याही निर्णयाचा आधार काय आहे, हे प्रत्येक नागरिकाला हे समजून घेण्याचा अधिकार आहे. तसेच निर्णयावर स्वत:चे मत व्यक्त करण्याचाही अधिकार आहे. मात्र, त्यापलिकडे जाऊ न्यायाधीशांना लक्ष्य केले जाते, तेव्हा प्रश्न पडताे की, हे खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? यातून एक गंभीर धाेका निर्माण हाेऊ शकताे. काॅलेजियम पद्धतीबाबत गैरसमज आहेत. मात्र, न्यायाधीशांच्या ज्येष्ठतेचा प्राधान्याने विचार करायला हवे, असे न्या. चंद्रचूड म्हणाले.

असे मत बनविणे धाेकादायक

आजकाल लाेक युट्यूब किंवा इतर साेशल मीडियावर पाहिलेल्या २० सेकंदाच्या व्हिडीओच्या आधारे मत बनवितात. हा न्यायव्यवस्थेसाठी फार माेठा धाेका आहे. न्याधीशांना ट्राेल करुन निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला जाताे. यापासून सावध राहायला हवे, असे न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले. 

राजकारणातील प्रवेशाबाबत काय म्हणाले न्या. चंद्रचूड?

न्यायाधीशांनी राजकारणात प्रवेश करायला हवा का? या प्रश्नावर न्या. चंद्रचूड म्हणाले की, कायद्यानुसार यावर काेणतेही बंधन नाही. समाज तुम्हाला सेवानिवृत्तीनंतरही न्यायाधीशाच्या रुपात पाहताे. जे काम इतर नागरिकांसाठी ठीक आहे, ते न्यायाधीशांसाठी पदावरुन हटल्यानंतरही ठीक नाही. माझे काम आणि न्यायपालिकेच्या प्रामाणिकपणावर संशय निर्माण हाेईल, असे काेणतेही काम मी ६५ वर्षांचा झाल्यानंतर करणार नाही, असे सांगत आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे संकेत दिले.

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड