शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने तिकीट कापले, माजी आमदार ढसाढसा रडले…; शशीरंजन यांनी दिले पक्ष सोडण्याचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:49 IST

Former BJP MLA Shashi Ranjan Parmar : माजी आमदार शशीरंजन परमार यांचं तिकीट भाजपनं रद्द केलं आहे. त्यांच्या जागी भाजपनं किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

Haryana Assembly Elections 2024 : भिवानी : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने अनेक जुन्या नेत्यांची तिकिटे रद्द केली असून, अनेक नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. त्यामुळं तिकिट वाटपावरून नाराज भाजपच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करणं सुरू केलं आहे. 

भिवानी जिल्ह्यातील तोशाम विधानसभा मतदारसंघातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील माजी आमदार शशीरंजन परमार यांचं तिकीट भाजपनं रद्द केलं आहे. त्यांच्या जागी भाजपनं किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर शशीरंजन परमार अतिशय भावूक झाले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शशीरंजन परमार हे रडताना दिसत आहेत. 

भाजपाने तिकीट कापल्यानंतर पत्रकारांनी माजी आमदार शशीरंजन परमार यांच्याशी संवाद साधला. यावेळी तिकीट कापल्याने नाराज झालेल्या शशीरंजन परमार यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा रडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते कार्यकर्त्यांना कसं प्रोत्साहन दिलं जाईल, हेही सांगताना ऐकू येत आहे. तसंच, शशी रंजन यांनी आता भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, माजी आमदार शशीरंजन परमार हे भिवानी आणि तोशाम या विधानसभा जागांवर आपला दावा करत होते.

किरण चौधरी यांच्या मुलीला मिळाले तिकीटहरियाणातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शशीरंजन यांनी किरण चौधरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शशीरंजन परमार यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत किरण चौधरी यांना ७२,६९९ मतं मिळाली होती, तर भाजपचे शशी रंजन परमार यांना केवळ ५४,६४० मतं मिळाली होती. या निवडणुकीनंतर किरण चौधरी यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. आता भाजपने किरण चौधरी यांची मुलगी श्रुती चौधरी हिला उमेदवारी दिली आहे. तर आता काँग्रेस आपल्या जागेवर कोणाला उमेदवारी देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा