शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"अटकेनंतर अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा अधिकार गमावला", आपच्या माजी मंत्र्याची हायकोर्टात याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 07:58 IST

उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या याचिकेवर सोमवार ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील, असे आपकडून म्हटले जात आहे. तर दुसरीकडे भाजपा नैतिकतेच्या आधारावर अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. 

यादरम्यान आपचे माजी आमदार आणि मंत्री संदीप कुमार यांनी आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करत अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा अधिकार गमावल्याचे माजी आमदार संदीप कुमार यांनी याचिकेत म्हटले आहे. संदीप कुमार यांनी शनिवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. 

याचिकेत म्हटले आहे की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांनी (केजरीवाल) दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार गमावला आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या याचिकेवर सोमवार ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, यापूर्वी न्यायालयाने अशाच मागण्या असलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या होत्या आणि ही बाब मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रातील असल्याचे म्हटले होते. यामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

कोण आहेत संदीप कुमार?२०१६ मध्ये आक्षेपार्ह सीडी वादानंतर आपने संदीप कुमार यांना निलंबित केले होते. या सीडीच्या वादात ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले होते. त्यावेळी ते महिला व बालविकास मंत्री होते. त्यानंतर २०१९ मध्ये, लोकसभा निवडणुकीत बसपाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत दिल्ली विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. तसेच, संदीप कुमार हे सुलतानपूर माजरा येथून आमदार होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआप