भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या घोषणेनंतर देशाचे परराष्ट्र सचिन विक्रम मिस्री यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. समाज कटकांनी मिस्त्री यांचे जुने फोटो शेअर करत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपमानास्पद कमेंट केल्या आहेत. यानंतर विक्रम मिश्री मिस्री एक्स अकाऊंट खाजगी करण्यात आले. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे मिस्री यांच्या समर्थनार्थ पुढे आले. ओवेसी यांनी एक्सद्वारे ट्रोलर्सना चांगलेच फटकारले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा आवाज म्हणून भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, लष्कराचे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग सगळ्यांसमोर आले. या तिन्ही अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत सतत पत्रकार परिषदा देऊन सैन्याच्या शौर्यपूर्ण कारवाईची माहिती जगाला दिली. परंतु, भारत आणि पाकिस्तान युद्धविरामानंतर सामाज कटकांनी विक्रम मिस्री यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचे वर्णन एक मेहनती आणि प्रामाणिक असे केले. ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, विक्रम मिस्री हे एक सभ्य, प्रामाणिक आणि मेहनती आहेत, जे आपल्या देशासाठी अथक परिश्रम घेत आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपले नागरी सेवक कार्यकारी मंडळाच्या अंतर्गत काम करतात. कार्यकारी मंडळाने किंवा देश चालवणाऱ्या कोणत्याही राजकीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांसाठी त्यांना दोषी ठरवू नये.
काँग्रेस नेते सलमान अनीस सोझ यांनीही परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांची बाजू घेत ट्रोलर्सवर टीका केली. काँग्रेस नेते सलमान अनीस सोझ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर लिहिले की, 'विक्रम मिस्री हे काश्मिरी आहेत आणि त्यांनी भारताला अभिमानाने गौरवले आहे. कितीही ट्रोलिंग केले तरी, त्यांची देशसेवा कमी होऊ शकत नाही. तुम्ही आभार मानू शकत नसाल तर, तोंड बंद ठेवा.'