शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जगासमोर कलम 370चा मुद्दा उपस्थित करणं बंद करा; भारताचे पाकला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 18:33 IST

भारतानं जम्मू-काश्मीरमधल्या कलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे.

नवी दिल्लीः केंद्रातल्या मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधल्याकलम 370मधील तरतुदी शिथिल करून त्याचे दोन प्रदेशात विभाजन केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार केल्यापासून पाकिस्तान भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आगपाखड करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सैरभैर झाले असून, त्यांनी संयुक्त राष्ट्रासह इतर जगातील देशांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानला कुठूनही या प्रकरणात मदत मिळालेली नाही. चीननंही पाकिस्तानकडे पाठ फिरवलेली आहे. त्यानंतर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.भारतानं जगासमोर स्वतःचा पक्ष ठेवला आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तान जीसुद्धा पावलं उचलतो आहे. तो सैरभैर झाल्यामुळेच असं करतोय. पाकिस्ताननं हवाई हद्द बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे, तसेच इतर जे काही रागाच्या भरात निर्णय घेत सुटला आहे, त्याचा पुनर्विचार करण्याचा आम्ही सल्ला दिला आहे. जगाचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच पाकिस्तान असं करतोय. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी हा मुद्दा उपस्थित केला, तर तिथेसुद्धा आम्ही त्यांना उत्तर देऊ, आम्ही जगातल्या अनेक राष्ट्रांना सांगितलं आहे की, हा आमचा अंतर्गत विषय आहे. आम्ही जोसुद्धा निर्णय घेतला आहे, तो आमचा अंतर्गत विषय आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील जनताही पाकिस्तानविरोधात प्रदर्शन करत आहे. त्यांची समस्या सोडवण्याची गरज आहे. परंतु भारताची पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात काय रणनीती आहे, याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. 

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीर