मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय
By admin | Updated: September 4, 2015 22:45 IST
नागपूर : १५ वर्षांच्या मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोन महिलांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय
नागपूर : १५ वर्षांच्या मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोन महिलांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हे दाखल केले. लता मौदेकर, राखी रत्नू कर्मावत (वय ३७) अशी या दोघींची नावे आहेत. लता हिने तिच्या गंगाजमुनातील कुंटणखान्यात पीडित मुलीला डांबून ठेवले आणि तिच्याकडून ते जबरीने वेश्या व्यवसाय करवून घेत होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी शुक्रवारी लता आणि राखीवर गुन्हे दाखल केले. पीडित मुलीला मुक्त करण्यात आले असून, राखीला अटक करण्यात आली. लता फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. ---