शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नोकरीसाठी लष्करात सेवा सक्तीची? सरकारी नोकरीसाठी संरक्षण मंत्रालयास केली शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:50 IST

केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्याआधी लष्करात किमान पाच वर्षे सेवा सक्तीची केली जावी, अशी शिफारस संरक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीने केली आहे.

नवी दिल्ली: केंद्र व राज्य सरकारच्या सेवांमध्ये नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना त्याआधी लष्करात किमान पाच वर्षे सेवा सक्तीची केली जावी, अशी शिफारस संरक्षण मंत्रालयाशी संलग्न संसदीय स्थायी समितीने केली आहे.या समितीचा अहवाल अलीकडेच संसदेत सादर करण्यात आला. त्यानुसार केंद्र व राज्य सरकारांमध्ये राजपत्रित पदांवर थेट भरतीसाठी उमेदवारांना त्या नोकरीच्या आधी सैन्य दलांमध्ये सेवा करण्यास लावावी, असे सुचविण्यात आले आहे. मात्र सरकारी नोकरीसाठी निवड झाल्यावर प्रत्यक्ष नेमणुकीपूर्वी त्या उमेदवाराला लष्करी सेवेसाठी पाठवायचे की अशा नोकरीसाठी आधी लष्करी सेवा केलेली असणे ही एक पात्रता अट ठेवायची, हे मात्र या शिफारशीवरून स्पष्ट होत नाही.संरक्षण मंत्रालयाने कार्मिक मंत्रालयाकडे या दृष्टीने नेटाने पाठपुरावा करावा, असेही या समितीने सुचविले आहे. परंतु संरक्षण मंत्रालयाने या शिफारशीवर अद्याप तरी पुढे काही पावले उचललेली दिसत नाहीत.सैन्य दलांमध्ये अधिकारी व जवानांची सातत्याने मोठी टंचाई भासत असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन समितीने ही शिफारस केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्य दलांमध्ये सध्या सुमारे ६० हजार पदे रिक्त आहेत.सैन्य दलनिहाय रिक्त पदेयंदाच्या १ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार तिन्ही सैन्यदलांमधीलरिक्त पदांची स्थिती अशी होती.हवाई दलमंजूर पदे १,५५,०००भरलेली पदे १,३९,४९७रिक्त पदे १५,५०३लष्करमंजूर पदे १२.६४ लाखभरलेली पदे १२,३७ लाखरिक्त पदे २७,८६४नौदलएकूण मंजूर पदे ६७,२२८भरलेली पदे ५०,९७३रिक्त पदे १६,२५५एकूण ६० हजार रिक्त पदांपैकी 9,259पदे ही अधिकाºयांची तर इतर50,363पदे जवानांची आहेत. सर्वाधिक २७ हजार रिक्त पदे लष्करात आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान